S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • दुष्काळग्रस्तांसाठी स्वखर्चाने केली जेवणाची सोय
  • दुष्काळग्रस्तांसाठी स्वखर्चाने केली जेवणाची सोय

    Published On: Mar 30, 2013 11:18 AM IST | Updated On: Mar 30, 2013 11:18 AM IST

    30 मार्चबीड : इथं दुष्काळामुळे जनावरांना छावणीत आश्रय घ्यावा लागतोय. त्यामुळे जनावरांच्या मालकांनाही कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागतंय. जनावरांच्या देखभालीसाठी एका व्यक्तीला छावणीतच राहावं लागतं. पण, घरून आणलेलं जेवण उन्हामुळे रात्रीपर्यंत खराब होतं. त्यामुळे त्यांची एकवेळ उपासमार होते. ही अडचण लक्षात घेऊन छावणी चालक परमेश्वर शेळके यांनी या जनावरांच्या मालकांसाठी रात्रीच्या जेवणाची सोय केली आहे. आणि तीही स्वखर्चानं..इतकंच नाही तर ते छावणीत अतिरिक्त 200 जनावरांचा सांभाळही करत आहे. याचबरोबर जवळपास 100 जणांसाठी छावणीतच काही अंशी रोजगारही उपलब्ध करून दिला. ही सर्व सोय त्यांनी स्वतःच्या पैशांनी केली. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी परमेश्वर शेळके यांनी यातून एक आदर्श घालून दिला आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close