S M L

भारतातील सर्वात सुंदर स्त्रियांमध्ये अंजली भागवत

26 डिसेंबर, पुणेभारताची सर्वोत्तम शूटर म्हणून अंजली भागवतला आपण नेहमीच पाहिलं आहे पण आता अंजलीची एक नवीन ओळख झाली आहे. भारतातील 50 सुंदर स्त्रियांमध्ये अंजलीनं आपलं स्थान पटकावलं आहे. फेमिना मॅग्झीननं हा सर्व्हे केला आहे.भारताची आघाडीची नेमबाज अंजली भागवतच्या चेहर्‍यावर नेहमीच हसू असतं. ऑलिम्पिकमधे तिनं तीनवेळा भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे.आजवर तिला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. पण सध्या ती खुपच खुश आहे. कारण ही तसंच आहे. फेमिना मॅगझीनने निवडलेल्या भारतातील 50 सर्वात सुंदर स्त्रीयांमधे अंजलीचाही समावेश करण्यात आला आहे. "मला याचा आनंद आहे "मला याचा आनंद आहे. पण मी माझ्या लुक्सचा कधीच विचार केला नाही. आमचं सौंदर्य आमच्या खेळात असतं." असं अंजली म्हणाली.बीजिंग ऑलिम्पिकनंतर अंजली सध्या नविन भूमिकेत पाहायला मिळतेय. पुण्यात नव्यानेच तयार करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शुटींग रेंजमधे सध्या ती नवोदित नेमबाजांना प्रशिक्षण देत आहे. एकेकाळी महिलांच्या 10 मिटर एअर रायफल प्रकारात अंजली जगात नंबर होती. आजही तिला शुटींग जगतात तिला मानाचं स्थान आहे. मात्र ऑलिम्पिकमधे मेडल मिळवण्याचं तिचं स्वप्न अजुनही अपूर्णच आहे. मात्र हे स्वप्न पूर्ण करायचा तिचा निर्धार आजही कायम आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 26, 2008 01:26 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 26, 2008 01:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close