S M L

मेलबोर्न टेस्टमध्ये रिकी पाँटिंगची सेंच्युरी

26 डिसेंबर, मेलबोर्नऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानची दुसरी टेस्ट आजपासून मेलबोर्न वर सुरु झालीये. रिकी पाँटींगच्या जबरदस्त सेंच्युरी नंतरही टेस्टच्या पहिल्या दिवशी मॅचवर दक्षिण आफ्रीकेचंच वर्चस्व राहिलं. दिवस संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाचा स्कोर होता 280 रन्सवर 6 विकेट्सऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून बॅटींग करायचा निर्णय घेतला पण मॅथ्यु हेडन पुन्हा एकदा फ्लॉप गेला. दोन अंकी स्कोरही न करता एन्टीच्या बॉलिंगवर हेडन आऊट झाला. नील मॅकेन्झीनं रिकी पाँटींगचा सोपा कॅच सोडला आणि दक्षिण आफ्रिकेला याची मोठी किंमत मोजावी लागली. सायमन कॅटीचच्या साथीनं त्यानं 107 रन्सची भर टाकली.. 54 रन्सवर असताना कॅटीच स्टेनचा बळी ठरला. हसी भोपळाही फोडू नाही शकला पण पाँटिंग खंबीरपणे उभा राहिला. पूर्ण भरलेल्या एमसीजी स्टेडियममध्ये प्रेक्षकांनी त्याची 37 वी सेंच्युरी टाळ्यांच्या कडकडाटात साजरी केली.पण हा जल्लोष फार काळ टिकला नाही. पॉल हॅरीसनं पॉण्टिंगचा काटा काढला. सायमंड्सही 27 रन्सवर पॅव्हेलिअनमध्ये परतला. ऑस्ट्रेलिया 223 रन्सवर 5 विकेट असे झगडत होते. हॅडीन आणि क्लार्कनं 54 रन्सची पार्टनरशिप करत रन्स वाढवण्याचा प्रयत्न केला. पण एन्टीनीनं हेडनला आऊट करत इनिंगमधली आपली दुसरी विकेट घेतली. आता पहिल्या दिवस अखेर ऑस्ट्रेलियाला 6 विकेट गमावत 280 रन्स करता आले.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 26, 2008 03:26 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 26, 2008 03:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close