S M L
  • पद्म पुरस्काराने मान्यवरांचा गौरव

    Published On: Apr 5, 2013 12:58 PM IST | Updated On: Apr 5, 2013 12:58 PM IST

    05 एप्रिलनवी दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनामध्ये झालेल्या एका दिमाखदार समारंभात पद्म पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. महाराष्ट्रातून कला क्षेत्रासाठी कनक रेळे आणि सामाजिक सेवेसाठी शिवाजीराव गिरीधर पाटील यांना पद्मभूषण देऊन गौरवण्यात आलं. तर बी. आर. पंडित आणि पंडित सुरेश तळवळकर यांना कला क्षेत्रासाठी, निलीमा मिश्रा यांना सामाजिक सेवेसाठी, डॉ. दीपक पाठक यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रेतल्या योगदानासाठी, डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे आणि कल्पना सरोज यांना उद्योग क्षेत्रातल्या भरीव कामगिरीसाठी आणि डॉ. राजेंद्र बडवे यांना वैद्यकीय क्षेत्रातल्या अपूर्व कामगिरीबद्दल पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं. त्याशिवाय डीआरडीओचे प्रमुख डॉ. विजय सारस्वत,क्रिकेटपटू राहुल द्रविड, ऑलिंपिक पदक विजेती मेरी कोम, अभिनेत्री श्रीदेवी आणि शर्मिला टागोर, दिवंगत अभिनेता राजेश खन्ना यांनाही पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. एकूण दोन टप्प्यांमध्ये या पुरस्कारांचं वितरण होतंय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close