S M L
  • 'सुखदा'मध्ये माझा एकच फ्लॅट -अजित पवार

    Published On: Apr 20, 2013 11:57 AM IST | Updated On: May 10, 2013 01:33 PM IST

    20 एप्रिलमुंबईतील वरळी येथील सुखदा-शुभदा सोसायटीतल्या फ्लॅटबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलंय. नियमानुसार माझ्या नावावर फक्त एकच फ्लॅट आहे आणि तोही अधिकृत आहे. आठ बेनामी फ्लॅट नाहीत असं स्पष्ट करत अजित पवारांनी सर्व आरोप फेटाळले आहे. तसंच कॅगने आपला अहवाल सादर केला आहे पण माधव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी चौकशीमधून खरं काय ते बाहेर येईल. कॅग रिपोर्टवरती पुढच्या अधिवेशनात चर्चा होऊ शकते, असंही पवारांनी स्पष्ट केलं. सुखदा-शुभदा सहकारी गृहनिर्माण सोसायटीतल्या बेकायदा बांधकाम प्रकरणी मुंबई महानगरपालिकेने उपमुख्यमंत्री अजित पवार, वन मंत्री डॉ. पतंगराव कदम, शिवराज पाटील-चाकुरकर, भाजप नेते गोपीनाथ मुंडे, काँग्रेसप्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, अनिल देशमुख आणि त्यांचे पुत्र सलील देशमुख, रणजीत देखमुख, अण्णा डांगे, अशोक पाटील अशा राजकीय नेते आणि मंत्र्यांना नोटिसा पाठवल्या आहेत. सुखदा-शुभदा इमारतीच्या सोसायटीत बेकायदा बांधकामं बांधण्यात आली असून ही बांधकामं हटवावीत नाहीतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा आशयाची ही नोटीस देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close