S M L

भुल्लरची फाशी कायम, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

12 एप्रिलकाँग्रेसचे नेते मनिंदर सिंग भिट्टा यांच्यावर बॉम्बहल्ला करणार्‍या देवेंदर सिंग पाल भुल्लर याची फेर याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. 2003 मध्ये भुल्लरला सुप्रीम कोर्टाने फाशी सुनावली होती. त्यावर त्यानं 2011 मध्ये राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. पण राष्ट्रपतींनी तो फेटाळून लावला होता. मात्र, हा निर्णय घेण्यासाठी लागलेला आठ वर्षांचा कालावधी फार मोठा आहे, असा युक्तिवाद करून भुल्लरनं सुप्रीम कोर्टात फेर याचिका दाखल केली आणि फाशीच्या शिक्षेचं रुपांतर जन्मठेपेत करावं अशी मागणी केली होती. ती याचिका कोर्टाने आज फेटाळली. अकाली दलानं भुल्लरला फाशी देण्यास विरोध केला होता. या निर्णयामुळे सुखद धक्का बसल्याची प्रतिक्रिया बिट्टा यांनी व्यक्त केली. दहशतवाद्यांना फाशी देण्यात मतांचं राजकारण आड येत असल्याची टीका त्यांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 12, 2013 10:39 AM IST

भुल्लरची फाशी कायम, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

12 एप्रिल

काँग्रेसचे नेते मनिंदर सिंग भिट्टा यांच्यावर बॉम्बहल्ला करणार्‍या देवेंदर सिंग पाल भुल्लर याची फेर याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. 2003 मध्ये भुल्लरला सुप्रीम कोर्टाने फाशी सुनावली होती. त्यावर त्यानं 2011 मध्ये राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. पण राष्ट्रपतींनी तो फेटाळून लावला होता. मात्र, हा निर्णय घेण्यासाठी लागलेला आठ वर्षांचा कालावधी फार मोठा आहे, असा युक्तिवाद करून भुल्लरनं सुप्रीम कोर्टात फेर याचिका दाखल केली आणि फाशीच्या शिक्षेचं रुपांतर जन्मठेपेत करावं अशी मागणी केली होती. ती याचिका कोर्टाने आज फेटाळली. अकाली दलानं भुल्लरला फाशी देण्यास विरोध केला होता. या निर्णयामुळे सुखद धक्का बसल्याची प्रतिक्रिया बिट्टा यांनी व्यक्त केली. दहशतवाद्यांना फाशी देण्यात मतांचं राजकारण आड येत असल्याची टीका त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 12, 2013 10:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close