S M L

ओळख परेडमध्ये साक्षीदारांनी कसाबला ओळखलं

28 डिसेंबर मुंबईमुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यातला आरोपी मोहम्मद कसाबची ओळख परेड शनिवारी करण्यात आली. त्याच्याविरोधात दहा गुन्ह्यांची नोंद आहे. या गुन्ह्यांच्या प्रक्रियेनुसार त्याची ओळख परेड होणं आवश्यक होतं. शनिवारी कसाबची ओळख परेड करण्यात आल्यानंतर पुन्हा त्याची ओळख परेड करण्यात येत आहे. त्यामुळे आर्थर रोड जेलच्या सुरक्षितेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. मुंबईतलं आर्थर रोड जेल तसं नेहमीच चर्चेत असतं. पण, आता ह्या जेलची चर्चा जागतिक पातळीवर होत आहे. कारण मुंबई हल्ल्यात पकडण्यात आलेला दहशतवादी आमीर अजमल कसाबला या जेलमध्ये ओळख परेडसाठी ठेवण्यात आलं आहे. शनिवारच्या ओळख परेडमध्ये डी. बी. मार्ग पोलीस स्टेशनमधले 2 अधिकारी आणि रेल्वे पोलिसांच्या 2 जवानांनी त्याला ओळखलं. 26 नोव्हेंबरच्या रात्री सीएसटी रेल्वे स्टेशनवर अंदाधुंद गोळीबार करणारा दहशतवादी कसाबच आहे, असं त्यांनी सांगितलं. गिरगाव चौपाटीवर मारला गेलेला दुसरा एक दहशतवादी इस्माईल खान याचा साथीदार असलेला इसम हा कसाबच आहे, असं त्यांनी सांगितलं. आर्थररोड जेलचं अंडा सेलमध्ये कसाबला ठेवण्यात आलं आहे. ज्यात 32 खोल्या आहेत. त्याला ज्या सेल मध्ये ठेवण्यात आलं आहे, त्या सेलच्या दोन्ही बाजूंचे सेल रिकामे करण्यात आलेत. शिवाय त्या सेलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. कसाबवर नजर ठेवण्यासाठी 6 विशेष पोलीसही तैनात करण्यात आले आहेत. शिवाय कसाबला जेलमधलं जेवण दिलं जाणार नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या जेलमध्ये मालेगाव स्फोटातील आरोपी, इंडियन मुज्जाइद्दीनचे आरोपी, 7 / 11 च्या मुंबईबॉम्बस्फोटाचे आरोपी, दाऊदचे साथीदार अब्दुल कय्यूम आणि जमरूद्दीन अंसारी तसंच राजन टोळीच्या डी के राव या आरोपींनाही जेरबंद करण्यात आलं आहे. पण या सर्व आरोपीपासून त्याच्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं जातंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 28, 2008 12:38 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 28, 2008 12:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close