S M L

माजी स्थायी समिती अध्यक्षांचं पक्षकार्यालयही अनधिकृत !

17 एप्रिलकल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मल्लेश शेट्टी यांचं पक्षकार्यालसुद्धा अनधिकृत असल्याचं सिद्ध झालं आहे. हे कार्यालय नेतीवली नाक्यावर उभारण्यात आलं आहे. ही जागा साधारण दीड हजार चौरस फूट आहे. त्यावर मल्लेश शेट्टींनी या जागेवर दुकानांचे दोन गाळे उभे केलेत आणि या गाळ्यांमध्ये मल्लेश शेट्टींनी पक्षकार्यालय सुरु केलंय. पण महापालिकेच्या पळपुट्या धोरणामुळे आजपर्यंत या कार्यालयावर कारवाई झालेली नाही. कल्याण डोंबिवली महापालिकेनं 10 सप्टेंबर 2012 ला मल्लेश शेट्टीना नोटीस दिली होती. त्यानुसार, पंधरा दिवसात सर्व पुरावे सादर करावे अन्यथा कारवाई करण्यात येईल, असं महापालिकेनं शेट्टी यांना बजावलं होतं. पण शेट्टींनी कोणतेही पुरावे सादर केले नाहीत. आणि त्यानंतर अचानक चक्र फिरली आणि महापालिकेनं या बांधकामाकडे कानाडोळा केला. ही जागा गुरांना चरण्यासाठी राखीव होती, मात्र ती मल्लेश शेट्टीनी बळकावली. त्यानंतर या विभागाचे खासदार आनंद परांजपे आणि काही दक्ष नागरिकांनी याची तक्रार महापालिकेला केली. पण महापालिकेनं नोटीस बजावण्यापलीकडे काहीही केलेलं नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 17, 2013 05:02 PM IST

माजी स्थायी समिती अध्यक्षांचं पक्षकार्यालयही अनधिकृत !

17 एप्रिल

कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मल्लेश शेट्टी यांचं पक्षकार्यालसुद्धा अनधिकृत असल्याचं सिद्ध झालं आहे. हे कार्यालय नेतीवली नाक्यावर उभारण्यात आलं आहे. ही जागा साधारण दीड हजार चौरस फूट आहे. त्यावर मल्लेश शेट्टींनी या जागेवर दुकानांचे दोन गाळे उभे केलेत आणि या गाळ्यांमध्ये मल्लेश शेट्टींनी पक्षकार्यालय सुरु केलंय. पण महापालिकेच्या पळपुट्या धोरणामुळे आजपर्यंत या कार्यालयावर कारवाई झालेली नाही. कल्याण डोंबिवली महापालिकेनं 10 सप्टेंबर 2012 ला मल्लेश शेट्टीना नोटीस दिली होती. त्यानुसार, पंधरा दिवसात सर्व पुरावे सादर करावे अन्यथा कारवाई करण्यात येईल, असं महापालिकेनं शेट्टी यांना बजावलं होतं. पण शेट्टींनी कोणतेही पुरावे सादर केले नाहीत. आणि त्यानंतर अचानक चक्र फिरली आणि महापालिकेनं या बांधकामाकडे कानाडोळा केला. ही जागा गुरांना चरण्यासाठी राखीव होती, मात्र ती मल्लेश शेट्टीनी बळकावली. त्यानंतर या विभागाचे खासदार आनंद परांजपे आणि काही दक्ष नागरिकांनी याची तक्रार महापालिकेला केली. पण महापालिकेनं नोटीस बजावण्यापलीकडे काहीही केलेलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 17, 2013 05:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close