S M L

आदर्श प्रकरणी नेते सुटणार, अधिकारी अडकणार?

18 एप्रिलराज्यात राजकीय भूकंप घडवणार्‍या आदर्श सोसायटी घोटाळ्याबाबत महत्त्वपूर्ण अहवाल आज सरकारला सादर होणार आहे. बंद लिफाफ्यातला हा न्यायालयीन समितीचा अहवाल महत्त्वाचा आहे. या न्यायालयीन आयोगात माजी न्यायमूर्ती पी.ए.पाटील आणि पी. सुब्रम्हण्यम हे आहेत. आयबीएन लोकमतला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या अहवालात राजकीय नेत्यांना क्लिन चीट देण्यात आली असून सनदी अधिकार्‍यांवर ठपका ठेवण्यात आलाय. आज हा अहवाल ही समिती आज सादर करणार आहे. मात्र तो पटलावर मांडण्यात येईल की नाही, याबद्दल संभ्रम कायम आहे. आदर्श प्रकरणात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, दिवगंत नेते विलासराव देशमुख यांच्यासह 14 जणांवर आरोप करण्यात आले आहे. 'आदर्श' मुख्यमंत्री- अशोक चव्हाणांनी आदर्शच्या भूखंडाला मंजुरी मिळवून देण्यात, सोसायटीमध्ये नागरी सदस्यांसाठी परवानगी मिळवण्यात, रिक्रीएशन ग्राऊंडची जागा आदर्श सोसायटीला देण्यात आणि आदर्शला एमएमआरडीएचं आक्युपन्सी सर्टिफिकेट देण्यात भूमिका होती.विलासरावांच्या काळात नगरविकास खात्यानं आदर्श सोसायटीला दोन महत्वाच्या परवानग्या दिल्या आणि बॅकबे बेस्ट डेपोचा आरक्षित भूखंडाचं आदर्शला हस्तांतरित करण्यात आला शेवटी आदर्शसमोरच्या प्रकाश पेठे मार्गाची रूंदी कमी करण्यात आली.तर सुशीलकुमार शिंदेंच्या काळात आदर्श सोसायटीला जमीन वाटपपत्र जारी झालं आणि आदर्शच्या वाढीव 51 नागरी सदस्यांच्या फ्लॅट वितरणाला मंजुरी मिळालीमुंबई महापालिकेचे आयुक्त जयराज फाटक यांचा आदर्श घोटाळ्यात सहभाग आदर्शच्या जागे नुसार सोसायटीला इमारत बांधण्यासाठी केवळ तीस मिटर उंची पर्यत परवानगी मिळायला हवी होती. पण जयराज फाटक हे हायराईज कमिटीचे सदस्य होते. यावेळी या कमिटीने 30 मिटर ऐवजी 90 मिटर परवानगी दिली एवढचे नव्हे तर फाटक हे पालिका आयुक्त असताना त्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करुन आदर्शची इमारत 103 मीटर पर्यत बांधण्याची परवानगी दिली.रामानंद तिवारी आणि जयराज फाटक या दोघा अधिकार्‍यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करुन आदर्श सोसायटीला कैक हजार स्केअर फूट एफएसआय मिळवून दिला. या बदल्यात तिवारी यांचा मुलगा ओंमकार तिवारी याला तर फाटक यांचा मुलगा कनिष्क फाटक याला आदर्श सोसायटीत फ्लट मिळाला आहे.रामानंद तिवारी यांचा आदर्श घोटाळ्यात सहभाग युती सरकारच्या काळात आदर्शची फाईल बंद झाली. पण 1999 साली सत्तेवर आलेल्या काँग्रेस आघाडी सरकारने आदर्शची फाईल पुन्हा उघडली. या फायलीच्या अंतिम मंजुरीच्या आड येणार्‍या सर्व अनियमितता कायद्यातल्या उपविधींचा आधार घेऊन नियमित केल्या गेल्या. तसेच काही ठिकाणी कायद्यांचे उल्लंघन करण्याबरोबरच बनावट कागदपत्रांचा आधार घेण्यात आला. या सर्व कामात प्रमोटर्सला मोलाची साथ लाभली ती नगर विकास विभागाचे तत्कालिन प्रधान सचिव रामानंद तिवारी यांची. नगर विकास विभागाकडून फाईल क्लीअर होण्यास कुठलीही आडकाठी राहणार नाही, याची पुरेपूर काळजी रामानंद तिवारी यांनी घेतली. त्यांनीच आदर्शला इमारत विकासाची परवानगी दिली. एवढंच नाही, तर ही जमीन सीआरझेड-1 च्या ऐवजी सीआरझेड-2 मध्ये दाखवून, तिच्यावर बांधकाम करण्यास हरकत नसल्याची टिप्पणी रामानंद तिवारी यांनीच लिहिली. आदर्शची जमीन सीआरझेड-2 मध्ये येत असल्याचं पत्र रामानंद तिवारी यांच्या विभागाचे उपसचिव पी. व्ही. देशमुख यांच्या सहीनिशी जारी झालंय. पर्यावरणाच्या परवानगीच्या रुपात नगर विकास विभागाचे पत्रच आदर्शच्या फायलीत जोडण्यात आलंय. त्यामुळेच आदर्शला पर्यावरणाची परवानगीच नाही, हे सिद्ध झालंय. या घोटाळ्याच्या सूत्रधारांना मदत केल्याची बिदागी म्हणून रामानंद तिवारी यांचा मुलगा ओंकार तिवारी आणि पी. व्ही. देशमुख यांना स्वतःला आदर्शमध्ये फ्लॅटस् मिळाले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 02:27 PM IST

आदर्श प्रकरणी नेते सुटणार, अधिकारी अडकणार?

18 एप्रिल

राज्यात राजकीय भूकंप घडवणार्‍या आदर्श सोसायटी घोटाळ्याबाबत महत्त्वपूर्ण अहवाल आज सरकारला सादर होणार आहे. बंद लिफाफ्यातला हा न्यायालयीन समितीचा अहवाल महत्त्वाचा आहे. या न्यायालयीन आयोगात माजी न्यायमूर्ती पी.ए.पाटील आणि पी. सुब्रम्हण्यम हे आहेत. आयबीएन लोकमतला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या अहवालात राजकीय नेत्यांना क्लिन चीट देण्यात आली असून सनदी अधिकार्‍यांवर ठपका ठेवण्यात आलाय. आज हा अहवाल ही समिती आज सादर करणार आहे. मात्र तो पटलावर मांडण्यात येईल की नाही, याबद्दल संभ्रम कायम आहे. आदर्श प्रकरणात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, दिवगंत नेते विलासराव देशमुख यांच्यासह 14 जणांवर आरोप करण्यात आले आहे.

'आदर्श' मुख्यमंत्री- अशोक चव्हाणांनी आदर्शच्या भूखंडाला मंजुरी मिळवून देण्यात, सोसायटीमध्ये नागरी सदस्यांसाठी परवानगी मिळवण्यात, रिक्रीएशन ग्राऊंडची जागा आदर्श सोसायटीला देण्यात आणि आदर्शला एमएमआरडीएचं आक्युपन्सी सर्टिफिकेट देण्यात भूमिका होती.

विलासरावांच्या काळात नगरविकास खात्यानं आदर्श सोसायटीला दोन महत्वाच्या परवानग्या दिल्या आणि बॅकबे बेस्ट डेपोचा आरक्षित भूखंडाचं आदर्शला हस्तांतरित करण्यात आला शेवटी आदर्शसमोरच्या प्रकाश पेठे मार्गाची रूंदी कमी करण्यात आली.

तर सुशीलकुमार शिंदेंच्या काळात आदर्श सोसायटीला जमीन वाटपपत्र जारी झालं आणि आदर्शच्या वाढीव 51 नागरी सदस्यांच्या फ्लॅट वितरणाला मंजुरी मिळाली

मुंबई महापालिकेचे आयुक्त जयराज फाटक यांचा आदर्श घोटाळ्यात सहभाग

आदर्शच्या जागे नुसार सोसायटीला इमारत बांधण्यासाठी केवळ तीस मिटर उंची पर्यत परवानगी मिळायला हवी होती. पण जयराज फाटक हे हायराईज कमिटीचे सदस्य होते. यावेळी या कमिटीने 30 मिटर ऐवजी 90 मिटर परवानगी दिली एवढचे नव्हे तर फाटक हे पालिका आयुक्त असताना त्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करुन आदर्शची इमारत 103 मीटर पर्यत बांधण्याची परवानगी दिली.

रामानंद तिवारी आणि जयराज फाटक या दोघा अधिकार्‍यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करुन आदर्श सोसायटीला कैक हजार स्केअर फूट एफएसआय मिळवून दिला. या बदल्यात तिवारी यांचा मुलगा ओंमकार तिवारी याला तर फाटक यांचा मुलगा कनिष्क फाटक याला आदर्श सोसायटीत फ्लट मिळाला आहे.

रामानंद तिवारी यांचा आदर्श घोटाळ्यात सहभाग

युती सरकारच्या काळात आदर्शची फाईल बंद झाली. पण 1999 साली सत्तेवर आलेल्या काँग्रेस आघाडी सरकारने आदर्शची फाईल पुन्हा उघडली. या फायलीच्या अंतिम मंजुरीच्या आड येणार्‍या सर्व अनियमितता कायद्यातल्या उपविधींचा आधार घेऊन नियमित केल्या गेल्या. तसेच काही ठिकाणी कायद्यांचे उल्लंघन करण्याबरोबरच बनावट कागदपत्रांचा आधार घेण्यात आला. या सर्व कामात प्रमोटर्सला मोलाची साथ लाभली ती नगर विकास विभागाचे तत्कालिन प्रधान सचिव रामानंद तिवारी यांची. नगर विकास विभागाकडून फाईल क्लीअर होण्यास कुठलीही आडकाठी राहणार नाही, याची पुरेपूर काळजी रामानंद तिवारी यांनी घेतली. त्यांनीच आदर्शला इमारत विकासाची परवानगी दिली.

एवढंच नाही, तर ही जमीन सीआरझेड-1 च्या ऐवजी सीआरझेड-2 मध्ये दाखवून, तिच्यावर बांधकाम करण्यास हरकत नसल्याची टिप्पणी रामानंद तिवारी यांनीच लिहिली. आदर्शची जमीन सीआरझेड-2 मध्ये येत असल्याचं पत्र रामानंद तिवारी यांच्या विभागाचे उपसचिव पी. व्ही. देशमुख यांच्या सहीनिशी जारी झालंय. पर्यावरणाच्या परवानगीच्या रुपात नगर विकास विभागाचे पत्रच आदर्शच्या फायलीत जोडण्यात आलंय. त्यामुळेच आदर्शला पर्यावरणाची परवानगीच नाही, हे सिद्ध झालंय. या घोटाळ्याच्या सूत्रधारांना मदत केल्याची बिदागी म्हणून रामानंद तिवारी यांचा मुलगा ओंकार तिवारी आणि पी. व्ही. देशमुख यांना स्वतःला आदर्शमध्ये फ्लॅटस् मिळाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 18, 2013 11:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close