S M L

असे बनले हिंदू दहशतवादातील बॉम्ब

29 डिसेंबर, पुणे अमेय तिरोडकरहिंदू दहशतवाद्यांनी बॉम्ब कसा बनवला हे आता उघड झालंय. मालेगांव बॉम्बस्फोट प्रकरणी पकडला गेलेला एक आरोपी राकेश धावडे याने याची सविस्तर माहिती अ‍ॅन्टी टेररिस्ट स्क्वाडला दिलीय. विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ नेते डॉक्टर शरद कुंटे यांनी हे बॉम्ब बनवण्याचं ट्रेनिंग आयोजित केलं होतं. याच प्रशिक्षणातून जे बॉम्ब बनवले त्यातून जालना, परभणी, पूर्णा इथं बॉम्बस्फोट करण्यात आले होते. हा जबाब आयबीएन लोकमतला मिळाला आहे. हिंदू दहशतवाद्यांना पुणे इथल्या सिंहगडजवळ बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण दिलं गेल्याचं म्हटलं गेलं. एटीएसला दिलेल्या राकेश धावडेच्या जबाबात ही गोष्ट आता स्पष्ट झाली आहे. धावडे याने आपण नोकरीच्या शोधात असताना डॉ. शरद कुंटे यांनी आपल्याला काही लोकांना मदत करून पैसे कमावायला सांगितल्याचं म्हटलंय. यातूनच राकेश धावडेचा या बॉम्ब बनवणार्‍यांशी संबंध आला आणि सुरू झाली हिंदू बॉम्बच्या जन्माची कहाणी.2003 मध्ये राकेश धावडेला डॉ. कुंटेने लोकवस्ती विरळ असलेली जागा सातारा आणि पुण्याच्या आसपास शोधायला सांगितली. इथे काही विद्यार्थ्यांची अभ्यास सहल आयोजित करायची असल्याचं कारणही होतं. साधारण दोन दिवसांत सिंहगड इथला 'आकांक्षा' हा बंगला ठरला. दोन दिवसांनी राकेश धावडेला स्वारगेट बसस्टँडकडून काही मुलांना या बंगल्यावर घेऊन जायला सांगण्यात आलं. या मुलांची ओळखीची खूण होती त्यांच्या अंगावरील कुठलाही एक निळा कपडा. त्यानंतर दोन दिवसांनी याच बंगल्यावर प्रो. देव नावाचा इसम भेटेल असं कुंटेने धावडेला सांगितलं. या साधारण पंचावन्न वर्षांच्या प्रो. देव यांनी राकेशला नंतरचे काही दिवस टॉर्च, बॅटरी सेल, अर्धा किलो लोखंडाचे जाड रिबिट या वस्तू आणण्यास सांगितल्या. ज्यातून बॉम्ब तयार केले गेले.एक दिवस गाडीतून प्रो. देव धावडेला घेऊन प्रात्यक्षिकासाठी सिंहगड भागातली निर्मनुष्य जागा पहायला घेऊन गेले. त्यांना घेरा सिंहगड जवळची पाभेखिंड इथली जागा आवडली. दुसर्‍या दिवशी धावडे, अभ्यास वर्गातली मुलं आणि प्रो. देव हे या ठिकाणी काही बॉक्स, बियरच्या बाटल्या आणि पाईप घेऊन गेले.यानंतर प्रो. देव यांनी मुलांना ते सामान क्रमानुसार लावायला सांगितलं. काही मुलांनी बॉक्समधील सामानाचे मिक्श्चर तयार केलं. आणि सोबतच्या तीन पाईपमध्ये ते टाकून ते पाईप बंद केले आणि तिथल्या दगडावर एका बाजूला एक असे ठेवले. त्यानंतर बियरच्या बाटल्यांमध्ये पेट्रोल ओतून आणि चिंधी लावून तयार करून ठेवले. त्यानंतर अगोदरचे मिक्श्चर असलेले पाईप वायर लावून आणि त्याला टेबल वॉच जोडले. यानंतर बाकीच्या पाईपमध्ये पावडर भरून त्या पाईप घेऊन लांब उभं रहायला त्या मुलांना सांगितलं. आणि मग, ते पाईप अगोदरच्या मिक्शर ठेवलेल्या दगडावर फेकायला सांगितले. ते फेकल्याबरोबरच दोन मोठे आवाज आले. यावेळी सगळ्यांच्या लक्षात आलं की फक्त दोनच स्फोट झालेत. मग, त्यांनी तिसरा पाईप शोधला. पण तो मिळाला नाही म्हणून बियरच्या बाटल्यांमदील चिंध्या पेटवून त्या बाटल्या दगडाच्या दिशेने फेकल्या. तेव्हा तिसरा स्फोट झाला. या स्फोटासोबतच बनला हिंदू बॉम्ब. या सगळ्यात आणखी कोण कोण सामील आहेत याचाच तपास आता एटीएस करत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 29, 2008 04:31 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 29, 2008 04:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close