S M L

रमाबाईनगर गोळीबार प्रकरणी सरकारची चालढकल

19 एप्रिलमुंबई : 1997 मध्ये घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगर गोळीबार प्रकरणी राज्य सरकार चालढकल करत असल्याचा आरोप दलित संघटनांनी केलाय. या प्रकरणात 11 दलितांच्या मृत्यूसाठी दोषी पोलीस मनोहर कदमला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेला हायकोर्टाने स्थगिती दिलीय. पण त्याविरोधात अपील करण्यात सरकारनं चालढकल करतंय असा दलित संघटनांचा आरोप आहे. या प्रकरणात मिहीर देसाई यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक केली. पण त्यांना याबद्दल कळवले नाही असा आरोपही या संघटनांनी केलाय. घटनाक्रम- शिवडी सेशन कोर्टात 7 मे 2009 रोजी निकाल लागला- मनोहर कदम 8 मे 2009 रोेजी हायकोर्टात गेला- त्याच्या अपीलावर तात्काळ निकाल देण्यात आला- त्याची 12 मे 2009 रोजी कदमची जामिनावर सुटका झाली.- दुसरीकडे कदम याच्या अपीलाला विरोध करण्यासाठी सरकारने तीन वर्ष घेतलीत.- सरकारनं या प्रकरणात ऍडव्होकेट मिहिर देसाई यांची विशेष सरकारी वकील म्हणून गेल्या वर्षी नेमणूक केली- पण धक्कादायक बाब म्हणजे नेमणूक झाल्याबाबत मिहीर देसाई यांना कळवण्यात ही आलेलं नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: May 10, 2013 02:59 PM IST

रमाबाईनगर गोळीबार प्रकरणी सरकारची चालढकल

19 एप्रिल

मुंबई : 1997 मध्ये घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगर गोळीबार प्रकरणी राज्य सरकार चालढकल करत असल्याचा आरोप दलित संघटनांनी केलाय. या प्रकरणात 11 दलितांच्या मृत्यूसाठी दोषी पोलीस मनोहर कदमला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेला हायकोर्टाने स्थगिती दिलीय. पण त्याविरोधात अपील करण्यात सरकारनं चालढकल करतंय असा दलित संघटनांचा आरोप आहे. या प्रकरणात मिहीर देसाई यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक केली. पण त्यांना याबद्दल कळवले नाही असा आरोपही या संघटनांनी केलाय.

घटनाक्रम

- शिवडी सेशन कोर्टात 7 मे 2009 रोजी निकाल लागला- मनोहर कदम 8 मे 2009 रोेजी हायकोर्टात गेला- त्याच्या अपीलावर तात्काळ निकाल देण्यात आला- त्याची 12 मे 2009 रोजी कदमची जामिनावर सुटका झाली.- दुसरीकडे कदम याच्या अपीलाला विरोध करण्यासाठी सरकारने तीन वर्ष घेतलीत.- सरकारनं या प्रकरणात ऍडव्होकेट मिहिर देसाई यांची विशेष सरकारी वकील म्हणून गेल्या वर्षी नेमणूक केली- पण धक्कादायक बाब म्हणजे नेमणूक झाल्याबाबत मिहीर देसाई यांना कळवण्यात ही आलेलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 19, 2013 10:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close