S M L

राज्यात थंडीची लाट

29 डिसेंबरगेले दोन दिवस राज्यात थंडीची लाट आली आहे. कोरडं हवामान आणिउत्तर भारतातून येणार्‍या थंड वार्‍यामुळे, बहुतेक शहरांमध्ये थंडी जाणवायला लागली आहे. राज्यात सर्वात कमी तापमान जळगाव मध्ये नोंदवल्या गेले आहे. पुणे, नाशिक, मालेगाव, परभणी, अकोला या भागात थंडीचा जोर जास्त आहे. रविवारी राज्यात सर्वात कमी तापमान जळगाव इथं 5.8 अंश नोंदवलं गेलं. मुंबईकरही गेले दोन दिवस थंडीचा आनंद लुटत आहेत. उत्तर भारतातही थंडीचा कडाका कायम आहे. अमृतसरमध्ये काल एकाएकी वाढलेल्या थंडीमुळे गेल्या आठवड्यांपर्यंत ओस पडलेली गरम कपड्यांची दुकाने आता ग्राहकांच्या गर्दीने पुन्हा फुलू लागली आहे .राज्यातल्या महत्त्वाच्या शहरातील रविवारचं तापमाननाशिक - 6.8, मुंबई - 17.8,रत्नागिरी - 16, सातारा - 9, नागपूर - 11सांगली - 10.5,सोलापूर - 12.2,कोल्हापूर - 14.4, औरंगाबाद - 6.7

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 29, 2008 03:15 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 29, 2008 03:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close