S M L

'आदर्श'मध्ये 20 बेनामी फ्लॅट, 35बोगस सदस्य

22 एप्रिलवादग्रस्त आदर्श सोसायटी प्रकरणाच्या न्यायालयीन अहवालात जमीन वाटप करताना नियमांचा भंग झाला असल्याचा ठपका ठेवण्यात आलाय अशी माहिती सूत्रांनी दिलीय. आदर्शच्या जमीन वाटपाबाबतची अधिसूचना काढण्यात आली नव्हती तसंच सोसायटीला बेस्ट डेपोची जागा आणि एफएसआय देताना एमआरटीपी (MRTP) कायद्याचं उल्लंघन झालं. याशिवाय या सोसायटीतले 35 सदस्य बोगस असून 20हून फ्लॅट्स बेनामी आहेत. सदस्यांना फ्लॅट देताना अफरातफर झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहेत. तसंच आदर्शला अतिरिक्त FSI देण्यात आला असल्याचं मत आयोगानं नोंदवलंय. प्रकाश पेठे मार्गाची जमीन घेतानाही नियमांचं उल्लंघन झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय. कागदपत्रांची योग्य शहानिशा न करता ICICI बँकेनं 24 सदस्यांना कर्जवाटप केल्याचा ठपका ठेवण्यात आला. बिल्डर जयंत शहांनी कन्हैयालाल गिडवानी आणि त्यांचा मुलगा कैलास गिडवानींना यांना आर्थिक मदत केल्याचं महत्त्वपूर्ण बाब नमूद केली आहे.न्यायालयीन आयोगाचा ठपका- जमीन वाटपाबाबतची अधिसूचना काढली नव्हती- आदर्शची जमीन वाटप करताना नियमांचा भंग- बेस्टची जमीन देताना MRTP कायद्याचं उल्लंघन - आदर्शला दिलेला अतिरिक्त FSI नियमबाह्य- आदर्शमधले 35 सदस्य बोगस आणि 20 फ्लॅट्स बेनामी- सनदी अधिकार्‍यांनी दिशाभूल केली- बिल्डर जयंत शहांनी कन्हैय्यालाल गिडवानी आणि त्यांचा मुलगा कैलास गिडवानींना केली आर्थिक मदत- या घोटाळ्यात कन्हैय्यालाल गिडवानींची सर्वात मोठी भूमिका- माजी मुख्यमंत्र्यांना काहीसा दिलासा, थेट दोषी नाहीत- पात्रतेची योग्य शहानिशा न करता ICICI बँकेचं 24 सदस्यांना कर्जवाटप- अजय संचेतींच्या सॅन फायनन्स कंपनीनं 10 सदस्यांना दिलं कर्ज- जयंत शहा यांनी गिडवानी पितापुत्रांसह 5 जणांच्या फ्लॅटसाठी पैसे- आदर्शची जमीन संरक्षण खात्याची नाही

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 22, 2013 12:35 PM IST

'आदर्श'मध्ये 20 बेनामी फ्लॅट, 35बोगस सदस्य

22 एप्रिल

वादग्रस्त आदर्श सोसायटी प्रकरणाच्या न्यायालयीन अहवालात जमीन वाटप करताना नियमांचा भंग झाला असल्याचा ठपका ठेवण्यात आलाय अशी माहिती सूत्रांनी दिलीय. आदर्शच्या जमीन वाटपाबाबतची अधिसूचना काढण्यात आली नव्हती तसंच सोसायटीला बेस्ट डेपोची जागा आणि एफएसआय देताना एमआरटीपी (MRTP) कायद्याचं उल्लंघन झालं. याशिवाय या सोसायटीतले 35 सदस्य बोगस असून 20हून फ्लॅट्स बेनामी आहेत. सदस्यांना फ्लॅट देताना अफरातफर झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहेत. तसंच आदर्शला अतिरिक्त FSI देण्यात आला असल्याचं मत आयोगानं नोंदवलंय. प्रकाश पेठे मार्गाची जमीन घेतानाही नियमांचं उल्लंघन झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय. कागदपत्रांची योग्य शहानिशा न करता ICICI बँकेनं 24 सदस्यांना कर्जवाटप केल्याचा ठपका ठेवण्यात आला. बिल्डर जयंत शहांनी कन्हैयालाल गिडवानी आणि त्यांचा मुलगा कैलास गिडवानींना यांना आर्थिक मदत केल्याचं महत्त्वपूर्ण बाब नमूद केली आहे.न्यायालयीन आयोगाचा ठपका

- जमीन वाटपाबाबतची अधिसूचना काढली नव्हती- आदर्शची जमीन वाटप करताना नियमांचा भंग- बेस्टची जमीन देताना MRTP कायद्याचं उल्लंघन - आदर्शला दिलेला अतिरिक्त FSI नियमबाह्य- आदर्शमधले 35 सदस्य बोगस आणि 20 फ्लॅट्स बेनामी- सनदी अधिकार्‍यांनी दिशाभूल केली- बिल्डर जयंत शहांनी कन्हैय्यालाल गिडवानी आणि त्यांचा मुलगा कैलास गिडवानींना केली आर्थिक मदत- या घोटाळ्यात कन्हैय्यालाल गिडवानींची सर्वात मोठी भूमिका- माजी मुख्यमंत्र्यांना काहीसा दिलासा, थेट दोषी नाहीत- पात्रतेची योग्य शहानिशा न करता ICICI बँकेचं 24 सदस्यांना कर्जवाटप- अजय संचेतींच्या सॅन फायनन्स कंपनीनं 10 सदस्यांना दिलं कर्ज- जयंत शहा यांनी गिडवानी पितापुत्रांसह 5 जणांच्या फ्लॅटसाठी पैसे- आदर्शची जमीन संरक्षण खात्याची नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 22, 2013 12:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close