S M L

मार्डचे डॉक्टर उद्यापासून बेमुदत संपावर

22 एप्रिलमुंबई : मार्डचे डॉक्टर उद्यापासून बेमुदत संपावर जाणार आहेत. वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांच्यासोबत मार्डची बैठक झाली. पण, त्यात तोडगा निघाला नाही. त्यामुळे राज्यातल्या 14 मेडिकल कॉलेजेसपैकी 13 कॉलेजमधील मार्डचे डॉक्टर उद्या सकाळी 8 वाजल्यापासून संपावर जाणार आहेत. तब्बल 3 हजार 500 मार्डचे डॉक्टर्स संपावर गेल्यानं वैद्यकीय सेवांवर मोठा परिणाम होऊ शकतो. मार्डच्या संपाचा मुंबईला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अनेक ऑपरेशन्स रद्द करण्याची वेळ येऊ शकते. हा संप नसून हे सामूहिक रजा आंदोलन असल्याचा दावा मार्डनं केला आहे. पण मार्डनं संपाची नोटीस दिलीये. त्यामुळे इस्मांतर्गत कारवाई करू असा इशारा सरकारनं दिलाय. 5 हजार रुपयांची स्टायपेंड वाढ देण्याची तयारी सरकारनं दाखवली होती. पण मार्डनं ती अमान्य केली. डॉक्टरांना मिळणार भत्ता 6 हजारवरून वाढवून 15 हजार करण्यात यावा आणि हा भत्ता 2009पासून द्यावा तसंच केंद्र सरकारची सेंट्रल रेसिडेंसी योजना राज्यातल्या निवासी डॉक्टरांनाही लागू कराव्या अशा विविध मागण्या डॉक्टरांनी केल्या आहे. मात्र या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता कमी आहे अशी माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळं राज्यातले 3 हजार 500 मार्डचे डॉक्टर्स संपावर जाणार आहे. राज्यातल्या 16 डेंटल कॉलेजेसपैकी 14 कॉलेजमधले मार्डचे डॉक्टर सामूहिक रजेवर जाणार आहेत. मुंबईत सायन, केईम, नायरला उद्यापासून रजा आंदोलन होणार आहे. जे जे हॉस्पिटल्सचे डॉक्टर टप्प्याटप्प्यानं आंदोलनात उतरणार असल्यानं लगेच फटका बसण्याची शक्यता नाही. मार्डच्या प्रमुख मागण्या काय आहेत ?- भत्ता 6 हजारवरून वाढवून 15 हजार करण्यात यावा, 2009पासून हा भत्ता द्यावा- निवासी डॉक्टरांची सुरक्षा वाढवावी- मेडिकलच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणारी 10 टक्के फीवाढ तातडीनं थांबवावी- केंद्र सरकारची सेंट्रल रेसिडेंसी योजना राज्यातल्या निवासी डॉक्टरांनाही लागू कराव्या- ओबीसींना मिळणार्‍या स्कॉलरशीपची अंमलबजावणी करावी- सेवा शतीर्ंचं योग्य पालन करावं

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 02:18 PM IST

मार्डचे डॉक्टर उद्यापासून बेमुदत संपावर

22 एप्रिल

मुंबई : मार्डचे डॉक्टर उद्यापासून बेमुदत संपावर जाणार आहेत. वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांच्यासोबत मार्डची बैठक झाली. पण, त्यात तोडगा निघाला नाही. त्यामुळे राज्यातल्या 14 मेडिकल कॉलेजेसपैकी 13 कॉलेजमधील मार्डचे डॉक्टर उद्या सकाळी 8 वाजल्यापासून संपावर जाणार आहेत. तब्बल 3 हजार 500 मार्डचे डॉक्टर्स संपावर गेल्यानं वैद्यकीय सेवांवर मोठा परिणाम होऊ शकतो.

मार्डच्या संपाचा मुंबईला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अनेक ऑपरेशन्स रद्द करण्याची वेळ येऊ शकते. हा संप नसून हे सामूहिक रजा आंदोलन असल्याचा दावा मार्डनं केला आहे. पण मार्डनं संपाची नोटीस दिलीये. त्यामुळे इस्मांतर्गत कारवाई करू असा इशारा सरकारनं दिलाय. 5 हजार रुपयांची स्टायपेंड वाढ देण्याची तयारी सरकारनं दाखवली होती. पण मार्डनं ती अमान्य केली.

डॉक्टरांना मिळणार भत्ता 6 हजारवरून वाढवून 15 हजार करण्यात यावा आणि हा भत्ता 2009पासून द्यावा तसंच केंद्र सरकारची सेंट्रल रेसिडेंसी योजना राज्यातल्या निवासी डॉक्टरांनाही लागू कराव्या अशा विविध मागण्या डॉक्टरांनी केल्या आहे. मात्र या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता कमी आहे अशी माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळं राज्यातले 3 हजार 500 मार्डचे डॉक्टर्स संपावर जाणार आहे. राज्यातल्या 16 डेंटल कॉलेजेसपैकी 14 कॉलेजमधले मार्डचे डॉक्टर सामूहिक रजेवर जाणार आहेत. मुंबईत सायन, केईम, नायरला उद्यापासून रजा आंदोलन होणार आहे. जे जे हॉस्पिटल्सचे डॉक्टर टप्प्याटप्प्यानं आंदोलनात उतरणार असल्यानं लगेच फटका बसण्याची शक्यता नाही.

मार्डच्या प्रमुख मागण्या काय आहेत ?

- भत्ता 6 हजारवरून वाढवून 15 हजार करण्यात यावा, 2009पासून हा भत्ता द्यावा- निवासी डॉक्टरांची सुरक्षा वाढवावी- मेडिकलच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणारी 10 टक्के फीवाढ तातडीनं थांबवावी- केंद्र सरकारची सेंट्रल रेसिडेंसी योजना राज्यातल्या निवासी डॉक्टरांनाही लागू कराव्या- ओबीसींना मिळणार्‍या स्कॉलरशीपची अंमलबजावणी करावी- सेवा शतीर्ंचं योग्य पालन करावं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 22, 2013 01:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close