S M L

MPSCची परीक्षा 18 मे रोजी

22 एप्रिलमुंबई : राज्य सेवा आयोग (एमपीएससी)ची वेबसाईट व्हायरसमुळे करप्ट झाल्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला होता. विद्यार्थ्यांच्या रेट्यापुढे ऐन पाच दिवसांवर आलेली परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. अखेरीस ही परीक्षा आता 18 मे 2013 रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून एकूण 2 लाख 98 हजार विद्यार्थी बसले आहे. त्यापैकी 2 लाख 60 हजार विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करण्यात आली आहेत. उरलेल्या 38,000 परिक्षाथीर्ंना माहिती अपडेट करण्याचं एमपीएसीने आवाहन केलं आहे. या विद्यार्थ्यांना नाव,नोंदणी क्रमांक आणि जिल्हा याची माहिती अपडेट करण्याचं एमपीएससीचे अध्यक्ष सुधीर ठाकरेंनी आवाहन केलं आहे.राज्य सेवा आयोग अर्थात 'एमपीएससी'ची 7 एप्रिल रोजी होणारी पूर्वपरीक्षा चांगलीच अडचणीत सापडली होती. एमपीएससीच्या वेबसाईटवर व्हायरसने हल्ला केल्यामुळे परीक्षार्थ्यांनी भरलेल्या अर्जांचा ऑनलाईन डाटा करप्ट झाला होता. त्यामुळे परिक्षाथीर्ंना पुन्हा नव्यानं फॉर्म भरावे असं आवाहन एमपीएससीने केलं होतं. या परीक्षेला दोन ते सव्वा दोन लाख विद्यार्थी बसले आहेत. त्यामुळे दोन दिवसात फॉर्म भरणे जवळपास शक्य नव्हते. अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरताना अडचणीना सामोरं जावं लागलं होतं. अखेरीस मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एमपीएससीच्या अधिकार्‍यांशी बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. पण एमपीएससीने 7 एप्रिल रोजी परीक्षा होईलच असा पवित्रा घेतला होता. या वादात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उडी घेत परीक्षा वेळेवर घेण्याचा अट्टहास का ? परीक्षा पुढे ढकलली तर कोणतं आभाळ कोसळणार आहे असा सवाल उपस्थित केला. अखेरीस 7 एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा दिलासादायक निर्णय एमपीएससीने घेतला. आज एमपीएससीचे अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी नव्या तारखेची घोषणा केली. पुढील महिन्यात 18 मे 2013 रोजी ही परीक्षा होणार आहे. ही परीक्षा ज्यामुळे पुढे ढकलण्यात आली होती तो करप्ट झालेला डाटा जवळपास पुर्ण झाला आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून एकूण 2 लाख 98 हजार विद्यार्थी बसले आहे. त्यापैकी 2 लाख 60 हजार विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करण्यात आली आहेत. उरलेल्या 38,000 परिक्षाथीर्ंनी नाव,नोंदणी क्रमांक आणि जिल्हा याची माहिती अपडेट करण्याचं सुधीर ठाकरेंनी आवाहन केलं आहे.MPSC ची वेबसाईट - http://www.mpsc.gov.in/

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 02:17 PM IST

MPSCची परीक्षा 18 मे रोजी

22 एप्रिल

मुंबई : राज्य सेवा आयोग (एमपीएससी)ची वेबसाईट व्हायरसमुळे करप्ट झाल्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला होता. विद्यार्थ्यांच्या रेट्यापुढे ऐन पाच दिवसांवर आलेली परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. अखेरीस ही परीक्षा आता 18 मे 2013 रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून एकूण 2 लाख 98 हजार विद्यार्थी बसले आहे. त्यापैकी 2 लाख 60 हजार विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करण्यात आली आहेत. उरलेल्या 38,000 परिक्षाथीर्ंना माहिती अपडेट करण्याचं एमपीएसीने आवाहन केलं आहे. या विद्यार्थ्यांना नाव,नोंदणी क्रमांक आणि जिल्हा याची माहिती अपडेट करण्याचं एमपीएससीचे अध्यक्ष सुधीर ठाकरेंनी आवाहन केलं आहे.

राज्य सेवा आयोग अर्थात 'एमपीएससी'ची 7 एप्रिल रोजी होणारी पूर्वपरीक्षा चांगलीच अडचणीत सापडली होती. एमपीएससीच्या वेबसाईटवर व्हायरसने हल्ला केल्यामुळे परीक्षार्थ्यांनी भरलेल्या अर्जांचा ऑनलाईन डाटा करप्ट झाला होता. त्यामुळे परिक्षाथीर्ंना पुन्हा नव्यानं फॉर्म भरावे असं आवाहन एमपीएससीने केलं होतं. या परीक्षेला दोन ते सव्वा दोन लाख विद्यार्थी बसले आहेत. त्यामुळे दोन दिवसात फॉर्म भरणे जवळपास शक्य नव्हते. अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरताना अडचणीना सामोरं जावं लागलं होतं. अखेरीस मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एमपीएससीच्या अधिकार्‍यांशी बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.

पण एमपीएससीने 7 एप्रिल रोजी परीक्षा होईलच असा पवित्रा घेतला होता. या वादात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उडी घेत परीक्षा वेळेवर घेण्याचा अट्टहास का ? परीक्षा पुढे ढकलली तर कोणतं आभाळ कोसळणार आहे असा सवाल उपस्थित केला. अखेरीस 7 एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा दिलासादायक निर्णय एमपीएससीने घेतला. आज एमपीएससीचे अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी नव्या तारखेची घोषणा केली.

पुढील महिन्यात 18 मे 2013 रोजी ही परीक्षा होणार आहे. ही परीक्षा ज्यामुळे पुढे ढकलण्यात आली होती तो करप्ट झालेला डाटा जवळपास पुर्ण झाला आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून एकूण 2 लाख 98 हजार विद्यार्थी बसले आहे. त्यापैकी 2 लाख 60 हजार विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करण्यात आली आहेत. उरलेल्या 38,000 परिक्षाथीर्ंनी नाव,नोंदणी क्रमांक आणि जिल्हा याची माहिती अपडेट करण्याचं सुधीर ठाकरेंनी आवाहन केलं आहे.

MPSC ची वेबसाईट - http://www.mpsc.gov.in/

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 22, 2013 01:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close