S M L

मेलबर्न टेस्टमध्ये दक्षिण अफ्रिकेसोमोर 183 रन्सचं आव्हान

29 डिसेंबर, मेलबर्नऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिके दरम्यान मेलबर्न इथं सुरु असलेली क्रिकेट टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 183 रन्सचं आव्हान ठेवलंय. चौथ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेचे 30 रन्स झाले आहेत. डेल स्टेनच्या भेदक बॉलिंगमुळे दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाची दुसरी इनिंग 243 रन्समध्ये गुंडाळली. कॅप्टन रिकी पाँटिंगची सेंच्युरी एका रनने हुकली. कालच्या बिनबाद चार रन्सच्या स्कोअरवर ऑस्ट्रेलियाने आपली दुसरी इनिंग आज पुढे सुरु केली. पण अर्ध्या तासातच मॅथ्यू हेडन 23 रन्सवर आऊट झाला. स्टेनने त्याची विकेट घेतली. त्यानंतर मग ऑस्ट्रेलियाला एकामगून एक हादरे बसत गेले. कॅटीच, हसी, क्लार्क, सायमंड्स आणि हॅडिन झटपट आऊट झाले. या पडझडीत कॅप्टन पाँटिंग मात्र पीचवर ठामपणे उभा राहिला आधी मायकेल क्लार्क बरोबर चौथ्या विकेटसाठी त्याने 96 रन्सची पार्टनरशिप केली. त्यात क्लार्कचा वाटा 23 रन्सचा. पण टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये सेंच्युरी करण्याची पाँटिंगची संधी मात्र हुकली. मॉर्केलच्या बॉलिंगवर ग्रॅम स्मिथने त्याचा कॅच पकडला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 29, 2008 09:13 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 29, 2008 09:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close