S M L

तीन लाख आधारधारकांचा डेटा क्रॅश, नव्याने नोंदणी करा !

मुंबई (23 एप्रिल) : देशभरात आधार कार्डच्या नोंदणीचा दुसरा टप्पा सुरु आहे. पण या दुसर्‍या टप्प्यात सर्वसामान्यांचे अतोनात हाल होतं आहे. कुठे नोंदणी केंद्र कमी असणं, नोंदणी करुन अनेक महिने आधार कार्ड न मिळणं अशा अनेक समस्यांना सामोरं जावा लागतं आहे. आता मात्र आणखी एक धक्का सर्वसामान्यांना सहन करावा लागणार आहे कारण, देशभरातील 15 लाख लोकांचा नोंदणी केलेला डेटा क्रॅश झाल्याची धक्कादायक माहिती सरकारनेच दिली आहे. UIDAI चे राज्यातील उपसंचालक अजयभूषण पांडेय यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील 3 लाख नागरिकांच्या माहितीचा डेटा क्रॅश झाला आहे. या सर्वांना नव्याने आधारसाठी नोंदणी करावी लागणार आहे. क्रॅश झालेल्या या माहितीचा गैरवापर होणार नाही असा दावाही अजयभूषण पांडे यांनी केलाय. आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये 5.4 कोटी लोकांनी आधारसाठी नोंदणी केलीय. यापैकी ज्यांचा डेटा क्रॅश झालाय त्याची माहिती परत मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. या सर्वांचा संपर्क क्रमांक आमच्याकडे आहे. आम्ही त्यांना संपर्क साधू असंही आश्वासन पांडे यांनी दिलंय. मात्र, तब्बल तीन लाख लोकांना पुन्हा एकदा आधारसाठी नोंदणी करावी लागणार आहे हे आता स्पष्ट झालं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 10, 2013 12:08 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 23, 2013 02:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close