S M L

दुष्काळाच्या झळा : बागा जळाल्या, अन् कर्जही मिळेना !

सिद्धार्थ गोदाम, जालनाजालना (23 एप्रिल): राज्यातल्या दुष्काळाची मोठी झळ मराठवाड्यातल्या मोसंबी उत्पादक शेतकर्‍यांना बसलीय. पोटच्या मुलांसारखी वाढवलेली मोसंबीची झाडं एकेक करून करपत आहेत. त्यामुळं या शेतकर्‍यांची अवस्था अत्यंत वाईट झालीय. ज्यांच्या बागा पूर्णपणे जळल्यात ते अनुदानाची वाट पाहत आहेत, तर ज्यांच्या हिरव्या बागा कशाबशा तग धरून आहेत त्या जगवण्याची या शेतकर्‍यांची धडपड चालू आहे. अशा पडत्या काळात त्यांना गरज आहे ती शासकीय मदतीची. पण त्यांना अजूनही कर्ज मिळालेलं नाहीय. राजू डोंगरे ... मोसंबी उत्पादक शेतकरी. राजू डोंगरे यांच्याकडे तब्बल 1,500 मोसंबीची झाडं होती. त्यांपैकी एक हजार पाण्याअभावी पूर्णपणे जळाल्याने हातातून गेली आहेत. मात्र 500 झाडं अजुनही जगण्याची धडपड करत आहेत. ही झाडं जगवण्यासाठी राजू डोंगरेंची धावपळ सुरू आहे. त्यासाठी त्यांनी मोसंबी पुर्नजीवन योजनेतून कर्जासाठी अर्ज केलाय. पण त्यांना अजूनही कशासाठीच कर्ज मिळालेलं नाही. ना वाळलेल्या बागांसाठी ना जीवंत झाडांना जगवण्यासाठी.मोसंबी पुर्नजीवन योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना 30 हजारांचं कर्ज मिळतं. त्यातून शेतकर्‍यांना बागेची देखभाल करावी लागते. या कर्जवाटपातही बरीच अनियमितता आहे. जालना जिल्ह्यात जवळपास 20 हजार हेक्टरसाठी 35 कोटीचा निधी आलाय. पण त्यातल्या फक्त 7 हजार रूपयांच्या निधीचं वाटप होऊ शकलंय.आता पेरण्यांचा काळही जवळ येतोय आणि शेतकर्‍यांना कर्ज मिळेल की नाही याचीही शाश्वती नाही. साहजिकच शेतकर्‍यांना पुढची काळजी लागली.आता जळालेली झाडं उखडून टाकावीत की, दुसर्‍या पिकाची तयारी करावी या संभ्रमात शेतकरी आहेत. कारण, मोसंबीची 20 ते 25 वर्षाची झाडं कर्ज मिळालं तरच जगवता येतील आणि कर्ज मिळालं नाही तर झाडं तर जातीलच पण आगामी पेरणीही त्यांना करता येणार नाही, त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशा संकटात मोसंबी उत्पादक सापडलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 02:13 PM IST

दुष्काळाच्या झळा : बागा जळाल्या, अन् कर्जही मिळेना !

सिद्धार्थ गोदाम, जालना

जालना (23 एप्रिल): राज्यातल्या दुष्काळाची मोठी झळ मराठवाड्यातल्या मोसंबी उत्पादक शेतकर्‍यांना बसलीय. पोटच्या मुलांसारखी वाढवलेली मोसंबीची झाडं एकेक करून करपत आहेत. त्यामुळं या शेतकर्‍यांची अवस्था अत्यंत वाईट झालीय. ज्यांच्या बागा पूर्णपणे जळल्यात ते अनुदानाची वाट पाहत आहेत, तर ज्यांच्या हिरव्या बागा कशाबशा तग धरून आहेत त्या जगवण्याची या शेतकर्‍यांची धडपड चालू आहे. अशा पडत्या काळात त्यांना गरज आहे ती शासकीय मदतीची. पण त्यांना अजूनही कर्ज मिळालेलं नाहीय.

राजू डोंगरे ... मोसंबी उत्पादक शेतकरी. राजू डोंगरे यांच्याकडे तब्बल 1,500 मोसंबीची झाडं होती. त्यांपैकी एक हजार पाण्याअभावी पूर्णपणे जळाल्याने हातातून गेली आहेत. मात्र 500 झाडं अजुनही जगण्याची धडपड करत आहेत. ही झाडं जगवण्यासाठी राजू डोंगरेंची धावपळ सुरू आहे. त्यासाठी त्यांनी मोसंबी पुर्नजीवन योजनेतून कर्जासाठी अर्ज केलाय. पण त्यांना अजूनही कशासाठीच कर्ज मिळालेलं नाही. ना वाळलेल्या बागांसाठी ना जीवंत झाडांना जगवण्यासाठी.

मोसंबी पुर्नजीवन योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना 30 हजारांचं कर्ज मिळतं. त्यातून शेतकर्‍यांना बागेची देखभाल करावी लागते. या कर्जवाटपातही बरीच अनियमितता आहे. जालना जिल्ह्यात जवळपास 20 हजार हेक्टरसाठी 35 कोटीचा निधी आलाय. पण त्यातल्या फक्त 7 हजार रूपयांच्या निधीचं वाटप होऊ शकलंय.

आता पेरण्यांचा काळही जवळ येतोय आणि शेतकर्‍यांना कर्ज मिळेल की नाही याचीही शाश्वती नाही. साहजिकच शेतकर्‍यांना पुढची काळजी लागली.

आता जळालेली झाडं उखडून टाकावीत की, दुसर्‍या पिकाची तयारी करावी या संभ्रमात शेतकरी आहेत. कारण, मोसंबीची 20 ते 25 वर्षाची झाडं कर्ज मिळालं तरच जगवता येतील आणि कर्ज मिळालं नाही तर झाडं तर जातीलच पण आगामी पेरणीही त्यांना करता येणार नाही, त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशा संकटात मोसंबी उत्पादक सापडलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 23, 2013 03:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close