S M L

प्राध्यापकांचे संपूर्ण थकीत वेतन महिन्याअखेरीस देणार -टोपे

23 एप्रिलमुंबई : गेल्या 79 दिवसांपासून संपावर असलेल्या प्राध्यापकांना राज्य सरकार आता पाचशे कोटी रुपयांची थकबाकी अदा करणार आहे. अर्थखात्याच्या परवानगीनंतर येत्या दोन दिवसात ही रक्कम त्यांना मिळणार आहे. तसंच दोन दिवसानंतर होणार्‍या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उर्वरित एक हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करुन येत्या 30 एप्रिलपूर्वी ती रक्कम प्राध्यापकांना अदा केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी दिली. पण, खुद्द मंत्र्यांनी ही घोषणा करूनही प्राध्यापकांकडून कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे संपाचा तिढा कायम आहे. मागिल आठवड्यात राजेश टोपे यांच्यासोबत प्राध्यापक संघटनेची बैठक झाली होती. या बैठकीत चर्चा सकारात्मक झाल्याचं संघटनेनं स्पष्ट केलं होतं. तर सरकारने आमच्याकडून संप मिटला असं जाहीर केलं होतं. मात्र प्राध्यापकांनी लेखी आश्वासनाची मागणी लावून धरली त्यामुळे संप आणखी चिघळला. प्राध्यापकांच्या संपामुळे मात्र विद्यार्थ्यांचे हाल होतं आहे. राज्यातील विद्यापीठातील परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 02:12 PM IST

प्राध्यापकांचे संपूर्ण थकीत वेतन महिन्याअखेरीस देणार -टोपे

23 एप्रिल

मुंबई : गेल्या 79 दिवसांपासून संपावर असलेल्या प्राध्यापकांना राज्य सरकार आता पाचशे कोटी रुपयांची थकबाकी अदा करणार आहे. अर्थखात्याच्या परवानगीनंतर येत्या दोन दिवसात ही रक्कम त्यांना मिळणार आहे. तसंच दोन दिवसानंतर होणार्‍या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उर्वरित एक हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करुन येत्या 30 एप्रिलपूर्वी ती रक्कम प्राध्यापकांना अदा केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी दिली. पण, खुद्द मंत्र्यांनी ही घोषणा करूनही प्राध्यापकांकडून कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे संपाचा तिढा कायम आहे. मागिल आठवड्यात राजेश टोपे यांच्यासोबत प्राध्यापक संघटनेची बैठक झाली होती. या बैठकीत चर्चा सकारात्मक झाल्याचं संघटनेनं स्पष्ट केलं होतं. तर सरकारने आमच्याकडून संप मिटला असं जाहीर केलं होतं. मात्र प्राध्यापकांनी लेखी आश्वासनाची मागणी लावून धरली त्यामुळे संप आणखी चिघळला. प्राध्यापकांच्या संपामुळे मात्र विद्यार्थ्यांचे हाल होतं आहे. राज्यातील विद्यापीठातील परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 23, 2013 05:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close