S M L

सिन्नरमध्ये इंडियाबुल्सच्या रेल्वेमार्गाचा प्रश्न चिघळला

दीप्ती राऊत, नाशिकनाशिक (24 एप्रिल): सिन्नरमध्ये इंडियाबुल्सच्या रेल्वेमार्गाला शेतकर्‍यांचा विरोध आहे. दुसरीकडे पोलिसी बळाच्या मदतीनं महसूल यंत्रणेनं इंडियाबुल्सच्या या रेल्वेमार्गासाठी संयुक्त मोजणी सुरू केलीय. फक्त संमती असलेल्यांचीच आम्ही मोजणी करतोय असा प्रशासनाचा दावा आहे तर आपली संमती नसतानाही जबरदस्तीनं आपली जमीन घेतली जात असल्याच्या शेतकर्‍यांच्या तक्रारी आहेत.हातात लाठ्या आणि डोक्यावर हेल्मेट... शेकडो पोलिसांचा फौजफाटा आणि दंगा नियंत्रण पथक...हे कोणत्याही दंगलीनंतरचं दृष्य नाही. तर हे दृष्य आहे सिन्नर तालुक्यातल्या नायगावच्या शेतातल्या बांधांवरचं. इंडियाबुल्सच्या रेल्वेलाईनसाठी सुरू असलेलं हे भूसंपादन...महसूल यंत्रणेनं इंडियाबुल्सच्या या रेल्वेमार्गासाठी याठिकाणी संयुक्त मोजणी सुरू केलीय. पण आपली संमती नसतानाही जबरदस्तीने आपली जमीन घेतली जात असल्याच्या शेतकर्‍यांच्या तक्रारी आहेत.नायगावच्या 2/3 शेतकर्‍यांची मान्यता आहे, बाकी सगळ्यांचा विरोध आहे. हे प्रशासन इंडियाबुलसाठी काम करतंय. शेतकर्‍यांसाठी काम करत नाही. मावळ प्रकरणासारखे गोळ्या घालू असं तहसीलदार म्हणतात अशी व्यथा येथील शेतकरी उद्धव सांगळे यांनी व्यक्त केली.तर आम्ही संमती असणार्‍यांचीच मोजणी करतोय असा दावा प्रांताधिकारी सरिता नरके यांनी केला. पण आम्ही कुठेही सही केली नाही, आमची संमती नाही तरी जबरदस्तीने आमची मोजणी करत आहेत असा आरोप शेतकरी जितेंद्र मंडलीक करत आहे.सोमनाथ पानसरे यांचं शेत या दुष्काळी परिस्थितीत आजही हिरवंगार आहे. त्यांच्या शेतातही जबरदस्तीनं मोजणी करण्यात आल्याची त्यांची तक्रार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 नुसार 29 ऑक्टोबर 2010 ला अधिसूचना काढून हे क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केलंय. विशेष म्हणजे ज्या इंडियाबुल्सच्या रेल्वेलाईनसाठी सरकारी यंत्रणा हे भूसंपादन करून देतेय, त्याला अद्याप सेंट्रल रेल्वेची मंजुरी मिळालेली नाही.असा आहे इंडियाबुल्सच्या या रेल्वेमार्ग प्रकल्प- इंडियाबुल्सचा खाजगी रेल्वेमार्ग- नायगाव, बारागाव पिंपरी,एकलहरा या 3 गावच्या जमिनींचं संपादन- जमीन गमावणारे शेतकरी - 462 - पूर्ण सह्या करणारे शेतकरी - 53- अंशत: सह्या करणारे शेतकरी - 168- संमती न देणारे शेतकरी - 158

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 24, 2013 12:30 PM IST

सिन्नरमध्ये इंडियाबुल्सच्या रेल्वेमार्गाचा प्रश्न चिघळला

दीप्ती राऊत, नाशिक

नाशिक (24 एप्रिल): सिन्नरमध्ये इंडियाबुल्सच्या रेल्वेमार्गाला शेतकर्‍यांचा विरोध आहे. दुसरीकडे पोलिसी बळाच्या मदतीनं महसूल यंत्रणेनं इंडियाबुल्सच्या या रेल्वेमार्गासाठी संयुक्त मोजणी सुरू केलीय. फक्त संमती असलेल्यांचीच आम्ही मोजणी करतोय असा प्रशासनाचा दावा आहे तर आपली संमती नसतानाही जबरदस्तीनं आपली जमीन घेतली जात असल्याच्या शेतकर्‍यांच्या तक्रारी आहेत.

हातात लाठ्या आणि डोक्यावर हेल्मेट... शेकडो पोलिसांचा फौजफाटा आणि दंगा नियंत्रण पथक...हे कोणत्याही दंगलीनंतरचं दृष्य नाही. तर हे दृष्य आहे सिन्नर तालुक्यातल्या नायगावच्या शेतातल्या बांधांवरचं. इंडियाबुल्सच्या रेल्वेलाईनसाठी सुरू असलेलं हे भूसंपादन...महसूल यंत्रणेनं इंडियाबुल्सच्या या रेल्वेमार्गासाठी याठिकाणी संयुक्त मोजणी सुरू केलीय. पण आपली संमती नसतानाही जबरदस्तीने आपली जमीन घेतली जात असल्याच्या शेतकर्‍यांच्या तक्रारी आहेत.

नायगावच्या 2/3 शेतकर्‍यांची मान्यता आहे, बाकी सगळ्यांचा विरोध आहे. हे प्रशासन इंडियाबुलसाठी काम करतंय. शेतकर्‍यांसाठी काम करत नाही. मावळ प्रकरणासारखे गोळ्या घालू असं तहसीलदार म्हणतात अशी व्यथा येथील शेतकरी उद्धव सांगळे यांनी व्यक्त केली.

तर आम्ही संमती असणार्‍यांचीच मोजणी करतोय असा दावा प्रांताधिकारी सरिता नरके यांनी केला. पण आम्ही कुठेही सही केली नाही, आमची संमती नाही तरी जबरदस्तीने आमची मोजणी करत आहेत असा आरोप शेतकरी जितेंद्र मंडलीक करत आहे.

सोमनाथ पानसरे यांचं शेत या दुष्काळी परिस्थितीत आजही हिरवंगार आहे. त्यांच्या शेतातही जबरदस्तीनं मोजणी करण्यात आल्याची त्यांची तक्रार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 नुसार 29 ऑक्टोबर 2010 ला अधिसूचना काढून हे क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केलंय. विशेष म्हणजे ज्या इंडियाबुल्सच्या रेल्वेलाईनसाठी सरकारी यंत्रणा हे भूसंपादन करून देतेय, त्याला अद्याप सेंट्रल रेल्वेची मंजुरी मिळालेली नाही.

असा आहे इंडियाबुल्सच्या या रेल्वेमार्ग प्रकल्प

- इंडियाबुल्सचा खाजगी रेल्वेमार्ग- नायगाव, बारागाव पिंपरी,एकलहरा या 3 गावच्या जमिनींचं संपादन- जमीन गमावणारे शेतकरी - 462 - पूर्ण सह्या करणारे शेतकरी - 53- अंशत: सह्या करणारे शेतकरी - 168- संमती न देणारे शेतकरी - 158

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 24, 2013 12:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close