S M L

'जायकवाडी धरणात 48 तासात पाणी सोडा'

24 एप्रिलऔरंगाबाद : दुष्काळाने होरपळणार्‍या मराठवाड्याला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलासा दिला आहे. येत्या 48 तासात जायकवाडी धरणात वरच्या धरणातून पाणी सोडण्यात यावे असे आदेश खंडपीठाने दिले आहेत. जल समान न्याय कायद्याअंतर्गत कोर्टानं हे आदेश दिले आहेत. प्रदीप देशमुख यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान कोर्टाने सरकार हे आदेश दिले आहे. सध्या मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ आहे. मराठवाड्याचं प्रमुख असलेल्या जायकवाडी धरण उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच पाणी पातळी खालावली होती. मध्यंतरी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणातून 2.5 टीएमसी पाणी सोडण्यात आले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2013 01:35 PM IST

'जायकवाडी धरणात 48 तासात पाणी सोडा'

24 एप्रिल

औरंगाबाद : दुष्काळाने होरपळणार्‍या मराठवाड्याला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलासा दिला आहे. येत्या 48 तासात जायकवाडी धरणात वरच्या धरणातून पाणी सोडण्यात यावे असे आदेश खंडपीठाने दिले आहेत. जल समान न्याय कायद्याअंतर्गत कोर्टानं हे आदेश दिले आहेत. प्रदीप देशमुख यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान कोर्टाने सरकार हे आदेश दिले आहे. सध्या मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ आहे. मराठवाड्याचं प्रमुख असलेल्या जायकवाडी धरण उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच पाणी पातळी खालावली होती. मध्यंतरी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणातून 2.5 टीएमसी पाणी सोडण्यात आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 24, 2013 04:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close