S M L

'MPSCची परीक्षा 18मे रोजीच, विद्यापीठांनी तारीख बदलावी'

25 एप्रिल मुंबई : राज्य सेवा आयोग (MPSC)ची परीक्षा 18 मे रोजी होणार असल्यामुळे त्या दिवशी पदवीच्या अंतिम वर्षाची किंवा पदव्युत्तर वर्षीची परीक्षा असेल तर त्या परीक्षेची तारीख बदलावी अशी विनंती राज्य लोकसेवा आयोगाने विद्यापीठांना केली आहे. यासंदर्भात आयोगाने विनंती करणारं पत्र सर्व विद्यापीठांना लिहिल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी आयबीएन-लोकमतला माहिती दिलीय. एमपीएससीच्या वेबसाईटवर व्हायरसने हल्ला केल्यामुळे परीक्षार्थीचा डाटा करप्ट झाला होता. त्यामुळे 7 एप्रिल रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. दोनच दिवसांपुर्वी आयोगाने 18 मे ही परीक्षेची तारीख जाहीर केली. नेहमी रविवारी होणारी परीक्षा यंदा शनिवारी आल्यामुळे विद्यार्थी आणखी अडचणीत सापडले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही परीक्षा 12 मे रोजी घ्यावी अशी सुचना केली होती. मात्र आयोगाने 18 मे रोजी परीक्षेची तारीख जाहीर केली. मात्र शनिवारी अनेक विद्यापीठांच्या परीक्षा आल्यामुळे एमपीएससीची परीक्षा द्यावी की विद्यापीठाची द्यावी असा सवाल विद्यार्थी विचारत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 10, 2013 12:01 PM IST

'MPSCची परीक्षा 18मे रोजीच, विद्यापीठांनी तारीख बदलावी'

25 एप्रिल

मुंबई : राज्य सेवा आयोग (MPSC)ची परीक्षा 18 मे रोजी होणार असल्यामुळे त्या दिवशी पदवीच्या अंतिम वर्षाची किंवा पदव्युत्तर वर्षीची परीक्षा असेल तर त्या परीक्षेची तारीख बदलावी अशी विनंती राज्य लोकसेवा आयोगाने विद्यापीठांना केली आहे. यासंदर्भात आयोगाने विनंती करणारं पत्र सर्व विद्यापीठांना लिहिल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी आयबीएन-लोकमतला माहिती दिलीय.

एमपीएससीच्या वेबसाईटवर व्हायरसने हल्ला केल्यामुळे परीक्षार्थीचा डाटा करप्ट झाला होता. त्यामुळे 7 एप्रिल रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. दोनच दिवसांपुर्वी आयोगाने 18 मे ही परीक्षेची तारीख जाहीर केली. नेहमी रविवारी होणारी परीक्षा यंदा शनिवारी आल्यामुळे विद्यार्थी आणखी अडचणीत सापडले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही परीक्षा 12 मे रोजी घ्यावी अशी सुचना केली होती. मात्र आयोगाने 18 मे रोजी परीक्षेची तारीख जाहीर केली. मात्र शनिवारी अनेक विद्यापीठांच्या परीक्षा आल्यामुळे एमपीएससीची परीक्षा द्यावी की विद्यापीठाची द्यावी असा सवाल विद्यार्थी विचारत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 25, 2013 12:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close