S M L

पाक म्हणतंय, 'गांधी-जिना' क्रिकेट सीरिज खेळूया !

25 एप्रिलभारत आणि पाकिस्तान या दोन देशांत जेव्हा तणावाचं वातावरण आहे, त्यातच आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या दोन्ही देशांतील क्रीडा संबंध सुधारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं बीसीसीआयला भारत-पाकिस्तान सीरिजचा एक नवा प्रस्ताव पाठवला आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान, खेळवण्यात येणार्‍या ऍशेस सीरिजच्या धर्तीवर ही सीरिज खेळवली जाईल असं या प्रस्तावात म्हटलंय. 'गांधी-जिन्हा सीरिज' असं या सीरिजचं नाव प्रस्तावित आहे. ही सीरिज भारतात होण्यासाठी पीसीबीनं तयारी दर्शवली आहे. तर भारत आणि पाकिस्तान सोडून ही सीरिज वेगळ्या ठिकाणी खेळवली जाऊ शकते असंही PCB नं बीसीसीआयला कळवलंय. ही सीरिज याच वर्षापासून खेळवली जावी असाही प्रस्ताव त्यांनी दिला. या वर्षी ऑगस्ट महिन्यात हे दोन्ही देश एकमेकांसोबत सीरिज खेळणार होते. पण बीसीसीआयनं ही सीरिज रद्द केली. पण आता हा नवा प्रस्ताव पीसीबीनं पाठवलाय. पण दोन्ही देशांमधील राजकीय संबंध ताणले गेले असल्यामुळे या प्रस्तावाचा अजून विचार केला गेला नाहीये असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 02:06 PM IST

पाक म्हणतंय, 'गांधी-जिना' क्रिकेट सीरिज खेळूया !

25 एप्रिल

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत जेव्हा तणावाचं वातावरण आहे, त्यातच आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या दोन्ही देशांतील क्रीडा संबंध सुधारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं बीसीसीआयला भारत-पाकिस्तान सीरिजचा एक नवा प्रस्ताव पाठवला आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान, खेळवण्यात येणार्‍या ऍशेस सीरिजच्या धर्तीवर ही सीरिज खेळवली जाईल असं या प्रस्तावात म्हटलंय. 'गांधी-जिन्हा सीरिज' असं या सीरिजचं नाव प्रस्तावित आहे. ही सीरिज भारतात होण्यासाठी पीसीबीनं तयारी दर्शवली आहे. तर भारत आणि पाकिस्तान सोडून ही सीरिज वेगळ्या ठिकाणी खेळवली जाऊ शकते असंही PCB नं बीसीसीआयला कळवलंय. ही सीरिज याच वर्षापासून खेळवली जावी असाही प्रस्ताव त्यांनी दिला. या वर्षी ऑगस्ट महिन्यात हे दोन्ही देश एकमेकांसोबत सीरिज खेळणार होते. पण बीसीसीआयनं ही सीरिज रद्द केली. पण आता हा नवा प्रस्ताव पीसीबीनं पाठवलाय. पण दोन्ही देशांमधील राजकीय संबंध ताणले गेले असल्यामुळे या प्रस्तावाचा अजून विचार केला गेला नाहीये असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 25, 2013 05:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close