S M L

किंग्ज इलेव्हन होमग्राऊंडवर

2 एप्रिलआयपीएलमध्ये तळाला असलेली किंग्ज इलेव्हन पंजाबची टीम पुन्हा एकदा आपल्या होम ग्राऊंडवर खेळणार आहे. आयपीएलमध्ये सातपैकी सहा मॅचमध्ये पराभव पत्कराव्या लागलेल्या किंग्जचा आज मुकाबला असेल, तो अनिल कुंबळेच्या बंगलोर रॉयल चॅलेजर्सशी. मोहालीत रंगणार्‍या या मॅचमध्ये विजय मिळवत किंग्ज इलेव्हन पराभवाची मालिका खंडित करणार, का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. टीममध्ये भक्कम खेळाडू असतानाही मोठी कामगिरी करण्यात ते अपयशी ठरतात हीच टीमची मालक प्रीती झिंटाची डोकेदुखी ठरली आहे. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्सची टीम चांगल्या कामगिरीनंतर पुन्हा एकदा घसरली आहे. गेल्या मॅचमध्ये त्यांना दिल्ली डेअरडेव्हिल्सने पराभवाचा धक्का दिला होता. आणि या पराभवामुळे बंगलोर पॉईंट टेबलमध्येही दुसर्‍या क्रमांकावरुन तिसर्‍या क्रमांकावर घसरली होती.पण आता फॉर्ममध्ये नसलेल्या किंग्जचा पराभव करत पुन्हा दुसरे स्थान गाठण्याची संधी बंगलोरकडे आहे. याआधी झालेल्या पहिल्या मॅचमध्ये बंगलोरने किंग्जचा तब्बल 8 विकेट राखून पराभव केला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 2, 2010 10:45 AM IST

किंग्ज इलेव्हन होमग्राऊंडवर

2 एप्रिल

आयपीएलमध्ये तळाला असलेली किंग्ज इलेव्हन पंजाबची टीम पुन्हा एकदा आपल्या होम ग्राऊंडवर खेळणार आहे.

आयपीएलमध्ये सातपैकी सहा मॅचमध्ये पराभव पत्कराव्या लागलेल्या किंग्जचा आज मुकाबला असेल, तो अनिल कुंबळेच्या बंगलोर रॉयल चॅलेजर्सशी. मोहालीत रंगणार्‍या या मॅचमध्ये विजय मिळवत किंग्ज इलेव्हन पराभवाची मालिका खंडित करणार, का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टीममध्ये भक्कम खेळाडू असतानाही मोठी कामगिरी करण्यात ते अपयशी ठरतात हीच टीमची मालक प्रीती झिंटाची डोकेदुखी ठरली आहे.

दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्सची टीम चांगल्या कामगिरीनंतर पुन्हा एकदा घसरली आहे. गेल्या मॅचमध्ये त्यांना दिल्ली डेअरडेव्हिल्सने पराभवाचा धक्का दिला होता. आणि या पराभवामुळे बंगलोर पॉईंट टेबलमध्येही दुसर्‍या क्रमांकावरुन तिसर्‍या क्रमांकावर घसरली होती.

पण आता फॉर्ममध्ये नसलेल्या किंग्जचा पराभव करत पुन्हा दुसरे स्थान गाठण्याची संधी बंगलोरकडे आहे. याआधी झालेल्या पहिल्या मॅचमध्ये बंगलोरने किंग्जचा तब्बल 8 विकेट राखून पराभव केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 2, 2010 10:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close