S M L

उद्या महाराष्ट्र दिनी मुंबई 'मेट्रो'ची 'भरारी'

30 एप्रिलमुंबई : मुंबईकर गेली दोन वर्षं आतुरतेने वाट पाहत असलेल्या मेट्रो रेल्वेची पहिली चाचणी उद्या म्हणजे महाराष्ट्र दिनी होणार आहे. मुंबईच्या पश्चिम आणि पुर्व उपनगरांना जोडणारा हा प्रमुख रेल्वे मार्ग असणार आहे. उद्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या पहिल्या मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. वर्साेवा डेपो ते आझाद नगर असा साडे तीन किलोमीटरच्या मार्गावर ही पहिली चाचणी होणार आहे. मेट्रो रेल्वेची वैशिष्ट्य1) मार्च 2008 साली सुरू झालेला हा प्रकल्प 2012 साली पूर्ण करण्याचं टार्गेट होतं. पण प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न न सुटल्यामुळे या प्रकल्पाला 1 वर्षाचा उशीर झाला. 2) मेट्रो रेल्वेच्या पहिल्या टप्यात वर्साेवा ते घाटकोपर हा 12 किलोमीटरचा मार्ग असणार आहे.3) या मार्गावर प्रत्येक किलोमीटरला एक स्टेशन असणार आहे. म्हणजेच एकूण 12 रेल्वे स्टेशन असणार आहेत.4) पहिल्या टप्यातील हा मेट्रो रेल्वेचा मार्ग संपूर्णपणे एलिव्हिेटीड असणार आहे.5) या पहिल्या प्रकल्पाला 2,356 कोटी रुपये खर्च आला.6) प्रवाश्यांसाठी खुष खबर म्हणजे ही मेट्रो रेल्वे संपूर्ण वातानुकुलीत असणार आहे.7) या मेट्रो रेल्वेच्या प्रवासाचे दर देखिल 8 रुपयांपासून ते 15 रुपयांपर्यंत असणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 01:59 PM IST

उद्या महाराष्ट्र दिनी मुंबई 'मेट्रो'ची 'भरारी'

30 एप्रिल

मुंबई : मुंबईकर गेली दोन वर्षं आतुरतेने वाट पाहत असलेल्या मेट्रो रेल्वेची पहिली चाचणी उद्या म्हणजे महाराष्ट्र दिनी होणार आहे. मुंबईच्या पश्चिम आणि पुर्व उपनगरांना जोडणारा हा प्रमुख रेल्वे मार्ग असणार आहे. उद्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या पहिल्या मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. वर्साेवा डेपो ते आझाद नगर असा साडे तीन किलोमीटरच्या मार्गावर ही पहिली चाचणी होणार आहे.

मेट्रो रेल्वेची वैशिष्ट्य

1) मार्च 2008 साली सुरू झालेला हा प्रकल्प 2012 साली पूर्ण करण्याचं टार्गेट होतं. पण प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न न सुटल्यामुळे या प्रकल्पाला 1 वर्षाचा उशीर झाला. 2) मेट्रो रेल्वेच्या पहिल्या टप्यात वर्साेवा ते घाटकोपर हा 12 किलोमीटरचा मार्ग असणार आहे.3) या मार्गावर प्रत्येक किलोमीटरला एक स्टेशन असणार आहे. म्हणजेच एकूण 12 रेल्वे स्टेशन असणार आहेत.4) पहिल्या टप्यातील हा मेट्रो रेल्वेचा मार्ग संपूर्णपणे एलिव्हिेटीड असणार आहे.5) या पहिल्या प्रकल्पाला 2,356 कोटी रुपये खर्च आला.6) प्रवाश्यांसाठी खुष खबर म्हणजे ही मेट्रो रेल्वे संपूर्ण वातानुकुलीत असणार आहे.7) या मेट्रो रेल्वेच्या प्रवासाचे दर देखिल 8 रुपयांपासून ते 15 रुपयांपर्यंत असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 30, 2013 12:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close