S M L

आदिवासी महिलेला मिळणार नोकरी : आयबीएन लोकमत इम्पॅक्ट

30 डिसेंबर, नागपूरप्रशांत कोरटकरनागपूर अधिवेशानादरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील मीनाक्षी चांदेकर या आदिवासी महिलेच्या आंदोलनाची बातमी आयबीएन लोकमतवर प्रसारित करण्यात आली. गेल्या अनेक वर्षापासून अनुकंपावर हक्काची नोकरी मिळावी म्हणून ही महिला थंडीत कुडकुडत आपल्या तान्हुल्यासह आंदोलन करत होती. याची लागलीच दखल घेत राज्य सरकारन तिला लवकरच नोकरी दिली जाईल असं सांगितल. त्यामुळे मीनाक्षीच्या संघर्षाला यश आलं आहे. नागपूरच्या कडाक्याच्या थंडीत उघड्यावर रस्त्याच्या कडेला अधिवेशानच्या पहिल्याच दिवसा पासून आपल्या तान्हुल्याला घेऊन आपल्या मागणी साठी मीनाक्षी चांदेकरन आंदोलन सुरू केलं. अनेक दिवस होऊनही कोणीच लक्षच देत नसल्यान हताश झालेल्या मिनाक्षीची बातमी आयबीएन लोकमत वर प्रसारित झाली आणि तिची दखल आमदारांना घ्यावीच लागली. "मी उर्जामंत्री सनील तटकरे यांची भेट घेतली. त्यांनी मला या प्रकरणात लक्ष घालण्याचं आश्वासन दिलं आहे" असं भाजप आमदार संदीप धुर्वे यांनी सांगितलं.मीनाक्षीचे वडील विद्यूत मंडळात लाईनमन म्हणून कामाला होते. 15 वर्षांपूर्वी त्यांचा ड्यूटीवर असताना मृत्यू झाला. तेव्हा पासून ती एकाकी लढाई लढतेय. अखेर अधिवेशनच्या अंतिम दिवसांत तिच्या मागणीची दखल घेतली गेली. "अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळणं हा तिचा हक्क आहे. तिला नोकरी मिळेलच, पण आजपर्यंत या बाबतीत का हयगय केली गेली, याचाही तपास केला जाईल" असं उर्जामंत्री सुनील तटकरे यांनी सांगितलं.मिनाक्षीन सरकार दरबारी खूप संघर्ष केला. पण तिच कोणी ऐकूनच घेतल नाही. पण आता खुद्द ऊर्जामंत्र्यांनीच या प्रकरणात लक्ष घातल्यानं तिला समाधान आहे. उर्जामंत्र्यांनी सकाळी माझी कैफियत ऐकून घेतली. त्यांनी मला संध्याकाळी परत बोलालवलं आहे. तोपर्यंत योग्य त्या कागदपत्रांची मी स्वत: लक्ष घालून पूर्तता करेन, असं आश्वासन त्यांनी मला दिलं" असं मीनाक्षीनं सांगितलं.नागपूर अधिवेशनादरम्यान अनेकजण अर्ध्यावरच आपली धीर सोडून आंदोलनं मागे घेतात ..पण मिनाक्षी सारखी जिद्द असली, तर हक्क मिळाल्या शिवाय राहत नाही, हेच यातून दिसून आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 30, 2008 06:39 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 30, 2008 06:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close