S M L
  • राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान

    Published On: May 3, 2013 05:23 PM IST | Updated On: May 10, 2013 11:30 AM IST

    03 मेनवी दिल्ली : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा नुकताच पार पडला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात मराठीला तब्बल 11 पुरस्कार देण्यात आले. यात धग सिनेमाचे दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा तर धगची अभिनेत्री उषा जाधवनं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार स्वीकारला. अनुमती सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विक्रम गोखले यांना प्रदान करण्यात आला. याशिवाय शैलेंद्र बर्वे यांना संहिताच्या संगीतासाठी रजतकमळ मिळालं. तर आरती अंकलीकर यांनी याच सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा ऍवॉर्ड स्वीकारला. या कार्यक्रमात त्यांच्या गायनाला उपस्थितांनी दाद दिली. याशिवाय इन्व्हेस्टमेंट सिनेमासाठी प्रतिभा मतकरी आणि रत्नाकर मतकरींचाही गौरव करण्यात आला. सर्वाधिक लोकप्रिय सिनेमा ठरला विकी डोनर.. आणि त्यासाठी सिनेमाचा निर्माता जॉन अब्राहमला गौरवण्यात आलं. तसंच इरफान खानलाही पानसिंग तोमर सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विभागून मिळाला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close