S M L

औरंगाबाद महापालिकेचे निरुपयोगी सीसीटीव्ही कॅमेरे

30 डिसेंबर, औरंगाबाद माधव सावरगावेऔरंगाबाद महापालिकेत बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे सध्या चर्चेत आले आहेत. जवळपास साडेपाच लाख रुपये खर्चून हे कॅमेरे बसवण्यात आलेत. पण त्यांचा उपयोग मात्र होत नाहीये. औरंगाबाद महापालिकेत अधिकारी आणि कर्मचारी खुर्चीवर कमी आणि बाहेर जास्त असतात. त्यामुळं त्यांच्यावर वॉच ठेवण्यासाठी हे कॅमरे लावण्यात आले खरे. पण त्याला कुणीच घाबरत नाहीत. कारण या कॅमेर्‍यांचं कंट्रोलिंग कुठंच नाही..शिवाय यातलं फुटेजही कुणी पाहत नाही. " महानगरपालिकेतले कर्मचारी नेमकं करतात तरी काय, असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी या कॅमे-यांचा उपयोग करण्यात आला होता. योजना तशी चांगली होती. मात्र दुदैर्व असं की लावल्यानंतर कधीच चालू झाले नाहीत," असं सत्ताधारी नगरसेवक संजय जोशी यांचं म्हणणं आहे.तत्कालीन महापालिका आयुक्त असिमकुमार गुप्ता यांनी कर्मचा-यांच्या गैरहजरीला कंटाळून हे कॅमेरे लावले..त्याला आता 10 महिने पूर्ण झाले..पण त्यांच्या या कॅमेर्‍यांचा वापर झाला नाही.महापालिकेच्या दोन्ही इमारतीतल्या या 64 कॅमेर्‍यांना खर्च आला, 5 लाख 52 हजार. विशेष म्हणजे तिजोरीत खडखडाट असताना गडबडीत हे बिल काढण्यात आलं. " हे जे कॅमेरे लावण्यात आले आहेत, हे वापरात आहेत की नाही, यांना वाली कोण आहे याची विचारपूस आम्ही करणार आहोत, " अशी माहिती काँग्रेसचे नगरसेवक दत्ताभाऊ पार्थीकर यांनी दिली. साडेपाच लाखांचा भुर्दंड लावण्यार्‍या अधिका-यांना शोधण्याचं काम आता विरोधक हाती घेत आहेत. अधिकार्‍यांच्याच संगनमतानं अशा अनेक योजना काही वर्षांपासून औरंगाबाद महापालिकेत आखल्या जातायत. आणि व्यवस्थित नियोजनानं त्याचा पैसाही लाटला जातो. मात्र त्याचा फटका महापालिकेच्या तिजोरीवर बसत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 30, 2008 04:57 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 30, 2008 04:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close