S M L

मोनिका हत्याप्रकरणाचा तपास महिला अधिकारी करणार

25 मार्चनागपूरच्या बहुचर्चित मोनिका किरणापुरे हत्याप्रकरणाचा तपास महिला आयपीएस अधिकार्‍याकडून होणार आहे. गृहमंत्री आर आर पाटील यांनी तसं आश्वासन दिलं आहे. भाजपच्या महिला शिष्टमंडळाने गृहमंत्र्यांची विधानभवनात भेट घेतली. त्यावेळी महिला तपास अधिकारी नेमण्याचे आश्वासन आर आर पाटील यांनी दिले.नागपूरमध्ये मोनिका किरणापुरे हिच्या हत्येला 15 दिवस उलटले आहे. पण अजून मारेकर्‍यांची माहिती मिळाली नाही. मोनिकाची हत्या करणार्‍या आरोपींची माहिती देणार्‍याला सरकारने एक लाख रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे. तसेच साक्षीदाराला सुरक्षा पुरवण्याची घोषणाही गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केली. नागपूरमध्ये भरदिवसा मोनिकाची हत्या करण्यात आली. त्यावेळी घटनास्थळी शेकडो नागरिक हजर होते. पण आरोपींची माहिती देण्यासाठी त्यापैकी कुणीही पुढं येत नाहीय. त्यामुळे आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश येतंय. त्यामुळे आरोपींची माहिती देणार्‍यास अखेर राज्य सरकारनं बक्षीस जाहीर केले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 25, 2011 12:04 PM IST

मोनिका हत्याप्रकरणाचा तपास महिला अधिकारी करणार

25 मार्च

नागपूरच्या बहुचर्चित मोनिका किरणापुरे हत्याप्रकरणाचा तपास महिला आयपीएस अधिकार्‍याकडून होणार आहे. गृहमंत्री आर आर पाटील यांनी तसं आश्वासन दिलं आहे. भाजपच्या महिला शिष्टमंडळाने गृहमंत्र्यांची विधानभवनात भेट घेतली. त्यावेळी महिला तपास अधिकारी नेमण्याचे आश्वासन आर आर पाटील यांनी दिले.

नागपूरमध्ये मोनिका किरणापुरे हिच्या हत्येला 15 दिवस उलटले आहे. पण अजून मारेकर्‍यांची माहिती मिळाली नाही. मोनिकाची हत्या करणार्‍या आरोपींची माहिती देणार्‍याला सरकारने एक लाख रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे. तसेच साक्षीदाराला सुरक्षा पुरवण्याची घोषणाही गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केली. नागपूरमध्ये भरदिवसा मोनिकाची हत्या करण्यात आली. त्यावेळी घटनास्थळी शेकडो नागरिक हजर होते. पण आरोपींची माहिती देण्यासाठी त्यापैकी कुणीही पुढं येत नाहीय. त्यामुळे आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश येतंय. त्यामुळे आरोपींची माहिती देणार्‍यास अखेर राज्य सरकारनं बक्षीस जाहीर केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 25, 2011 12:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close