S M L

पुण्यातही मार्ड आणि अस्मीचा संप

25 मार्चपुण्यामध्येही मार्ड आणि अस्मीनं संप पुकारला. ससून रुग्णालयात काम करणारे अंदाजे साडेतीनशे डॉक्टर्स या संपात सहभागी झाले. त्याबरोबरच अस्मीचेही अडीचशे इंटर्न्स या संपात सहभागी झाले. यामुळे ससून रुग्णालयातील सेवेवर त्याचा परिणाम झाला. रुग्णाना या संपाचा फटका बसला आहे. संध्याकाळी या संघटनांनी निषेध रॅली काढली. लाक्षणिक संपाची दखल सरकारने न घेतल्यास बेमुदत संप पुकारण्याचा इशारा मार्डने दिला आहे. राज्यात 3,500 निवासी डॉक्टर्स आहेत. तर अडीच हजार इंटर्न्स. निवासी डॉक्टर हे सरकारी हॉस्पिटलचा कणा मानले जातात. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाचा परिणाम वैद्यकीय सेवेवर तातडीने पडतो. नागपुरातही मेडीकल आणि मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील मार्डचे निवासी डॉक्टर आणि इंटर्न संघटनांनी सहभाग घेतला. मेडीकल रूग्णालयातील ओपीडी समोरून इंटर्न आणि निवासी डॉक्टरांनी मोर्चा काढून सरकारच्या धोरणाचा निषेध केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 25, 2011 02:28 PM IST

पुण्यातही मार्ड आणि अस्मीचा संप

25 मार्च

पुण्यामध्येही मार्ड आणि अस्मीनं संप पुकारला. ससून रुग्णालयात काम करणारे अंदाजे साडेतीनशे डॉक्टर्स या संपात सहभागी झाले. त्याबरोबरच अस्मीचेही अडीचशे इंटर्न्स या संपात सहभागी झाले. यामुळे ससून रुग्णालयातील सेवेवर त्याचा परिणाम झाला. रुग्णाना या संपाचा फटका बसला आहे. संध्याकाळी या संघटनांनी निषेध रॅली काढली. लाक्षणिक संपाची दखल सरकारने न घेतल्यास बेमुदत संप पुकारण्याचा इशारा मार्डने दिला आहे.

राज्यात 3,500 निवासी डॉक्टर्स आहेत. तर अडीच हजार इंटर्न्स. निवासी डॉक्टर हे सरकारी हॉस्पिटलचा कणा मानले जातात. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाचा परिणाम वैद्यकीय सेवेवर तातडीने पडतो. नागपुरातही मेडीकल आणि मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील मार्डचे निवासी डॉक्टर आणि इंटर्न संघटनांनी सहभाग घेतला. मेडीकल रूग्णालयातील ओपीडी समोरून इंटर्न आणि निवासी डॉक्टरांनी मोर्चा काढून सरकारच्या धोरणाचा निषेध केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 25, 2011 02:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close