S M L

कॉमनवेल्थ गेम्सदरम्यान 900 कोटींचा फटका

25 मार्चकॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणी सुरेश कलमाडींवर अजूनपर्यंत कुठलीही कारवाई झाली नसतानाच शुंगलू समितीने दिल्लीच्या नायब राज्यपालांवर ठपका ठेवला आहे. कॉमनवेल्थ खेळादरम्यान झालेल्या भ्रष्टाचाराचा तपास करण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली. समितीचा दुसरा अहवाल खेळाडूंच्या राहण्यासाठी बांधण्यात आलेल्या गेम्स व्हिलेज बद्दलचा आहे. हे व्हिलेज बांधताना सुमारे 220 कोटी रुपयांचे नुकसान सरकारी तिजोरीला झालं असा असल्याचा समितीचा अंदाज आहे. तसेच वेगवेगळ्या कामात झालेल्या दिरंगाईमुळे 900 कोटींचा फटका बसला आहे. यासाठी दिल्ली विकास प्राधिकरण, दिल्लीचे नायब राज्यपाल तेजेंदर खन्ना आणि कंत्राटदार एमार एमजीएफ यांना जबाबदार धरण्यात आलंय. यावर प्रतिक्रिया देताना तेजेंदर खन्नांनी म्हटलंय की गेम्स व्हिलेजचे बांधकाम पारदर्शक पद्धतीनं करण्यात आलं होतं. एमार एमजीएफने ही सर्व आरोपांचे खंडन केलंय. आम्ही सर्व गोष्टी नियमानुसार आणि वेळेत पूर्ण केल्या होत्या असा दावा कंपनीने केला आहे.शुंगलू समितीचा रिपोर्ट- कॉमनवेल्थच्या ढिसाळ नियोजनासाठी दिल्ली सरकार जबाबदार- दिल्ली सरकारकडून व्यवस्थित नियोजन झाल्याचा एकही पुरावा नाही - वेगवेगळ्या कामात झालेल्या दिरंगाईमुळे 900 कोटींचा फटका - डेव्हलपर एमार एमजीएफने 333 फ्लॅट चढ्या दराने विकले - अधिकार्‍यांच्या संगनमताने टेंडर्समध्ये गैरव्यवहार झाला - मोठ्या कॉन्ट्रॅक्टर्सना बाजूला ठेवण्यात आलं - छोट्या कॉन्ट्रॅक्टर्सना 1000 कोटींचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले - 2003 ते 2006 दरम्यान नियोजनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 25, 2011 05:22 PM IST

कॉमनवेल्थ गेम्सदरम्यान 900 कोटींचा फटका

25 मार्च

कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणी सुरेश कलमाडींवर अजूनपर्यंत कुठलीही कारवाई झाली नसतानाच शुंगलू समितीने दिल्लीच्या नायब राज्यपालांवर ठपका ठेवला आहे. कॉमनवेल्थ खेळादरम्यान झालेल्या भ्रष्टाचाराचा तपास करण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली.

समितीचा दुसरा अहवाल खेळाडूंच्या राहण्यासाठी बांधण्यात आलेल्या गेम्स व्हिलेज बद्दलचा आहे. हे व्हिलेज बांधताना सुमारे 220 कोटी रुपयांचे नुकसान सरकारी तिजोरीला झालं असा असल्याचा समितीचा अंदाज आहे. तसेच वेगवेगळ्या कामात झालेल्या दिरंगाईमुळे 900 कोटींचा फटका बसला आहे.

यासाठी दिल्ली विकास प्राधिकरण, दिल्लीचे नायब राज्यपाल तेजेंदर खन्ना आणि कंत्राटदार एमार एमजीएफ यांना जबाबदार धरण्यात आलंय. यावर प्रतिक्रिया देताना तेजेंदर खन्नांनी म्हटलंय की गेम्स व्हिलेजचे बांधकाम पारदर्शक पद्धतीनं करण्यात आलं होतं. एमार एमजीएफने ही सर्व आरोपांचे खंडन केलंय. आम्ही सर्व गोष्टी नियमानुसार आणि वेळेत पूर्ण केल्या होत्या असा दावा कंपनीने केला आहे.

शुंगलू समितीचा रिपोर्ट

- कॉमनवेल्थच्या ढिसाळ नियोजनासाठी दिल्ली सरकार जबाबदार- दिल्ली सरकारकडून व्यवस्थित नियोजन झाल्याचा एकही पुरावा नाही - वेगवेगळ्या कामात झालेल्या दिरंगाईमुळे 900 कोटींचा फटका - डेव्हलपर एमार एमजीएफने 333 फ्लॅट चढ्या दराने विकले - अधिकार्‍यांच्या संगनमताने टेंडर्समध्ये गैरव्यवहार झाला - मोठ्या कॉन्ट्रॅक्टर्सना बाजूला ठेवण्यात आलं - छोट्या कॉन्ट्रॅक्टर्सना 1000 कोटींचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले - 2003 ते 2006 दरम्यान नियोजनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 25, 2011 05:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close