S M L

40 लाख शेतक-यांना कर्जमाफी मिळणार

30 डिसेंबर नागपूरनागपूर विधानसभेत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शेतक-यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीबद्दल केलेल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात जे थकबाकीदार आहेत तसंच केंद्र सरकारच्या योजनेपासून वंचित आहेत अशा शेतक-यांच्या बाबतीत मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. त्यानिर्णयानुसार सरकारने एकूण रु.6,208 कोटींची कर्जमाफी केली आहे. शेतक-यांनी ज्या बँकाकडून कर्ज घेतली आहेत त्या बँकांना सरकार यासाठी पैसे देईल अशीही स्पष्ट घोषणा चव्हाण यांनी केली. रु.20 हजारापेक्षा कमी कर्ज घेणा-या शेतक-यांना पूर्णपणे कर्ज माफ केलं जाणार आहे. या कर्जमाफीचा फायदा राज्यातील 40 लाख शेतक-यांना होणार आहे.जे कर्जदार 1997 पूर्वीचे आहेत त्यांची संख्या 3,55,000इतकी आहे. त्यापैकी जे शेतकरी नियमित कर्जाची रक्कम भरतात अशा 2लाख 3,000 कर्जदारांचे रु.20,000पर्यंतचे कर्ज माफ केलं जाणार आहे. हे माफ केलेल्या कर्जाची रक्कम रु.257 कोटीपर्यंत आहे. तसंच ज्याच्या कर्जाची रक्कम रु.20,000च्यावर आहे त्यांनी रु.20,000 पर्यंत कर्जाची रक्कम भरली तर त्यांनाही कर्ज माफीचा लाभ घेता येणार आहे. आणि त्यानंतर सरकारने माफ केलेली कर्जाची रक्कम रु.284 कोटी इतकी असणार आहे. शेती व्यवसायासंबंधी ज्यांनी कर्ज घेतली आहेत अशा शेतक-यांनाही कर्जमाफी दिली जाणार आहे त्यांची एकूण रक्कम रु.318 कोटी आहे. तसंच कुक्कुटपालन आणि दुग्धव्यवसायासंबंधी ज्या शेतक-यांनी कर्ज घेतली आहेत अशा शेतक-यांनाही कर्जमाफी दिली जाणार आहे ह्या कर्जमाफीची रक्कम रु. 168 कोटी इतकी आहे.नागपूर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, कर्जमाफीच्या रूपाने सरकारने शेतक-यांना दिलेली नव-वर्षाची भेट म्हणता येईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 30, 2008 10:51 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 30, 2008 10:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close