S M L

रत्नागिरीत शांतता ; तबरेजचा मृतदेह ताब्यात घेतला

20 एप्रिलजैतापूरमध्ये तब्बल 40 तासानंतर पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झालेल्या तबरेजचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला आहे. तबरेजच्या मृतदेहावर साखरीनाटे इथं दुपारी 2 वाजता दफनविधी होणार आहे. मच्छीमार समाजाच्या नेत्यांनी तबरेजच्या नातेवाईकांची समजूत काढली आणि त्यानंतर त्यांनी तबरेजचा मृतदेह ताब्यात घेतला. सोमवारपासून पेटलेलं रत्नगिरीमधील वातावरण आता निवळायला लागलं आहे. इथं आज सकाळी 9 पर्यंत जमावबंदी होती. ती आता हटवण्यात आली आहे. आणि रत्नागिरीतील सगळे व्यवहार आता सुरळीत सुरू झालेत. 23 तारखेला तारापूर ते जैतापूर असा मार्च काढला जाणार आहे. त्यावेळेस पुढच्या आंदोलनाची दिशा ठरणार आहे.दरम्यान, रत्नागिरी शासकीय रूग्णालयात कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. पोलीस गोळीबारात ठार झालेल्या तबरेजचा मृतदेह इथं ठेवण्यात आला होता. पोस्टमार्टमवरुन काल जमावाने हॉस्पिटलच्या कर्मचार्‍यांना मारहाण केली होती. आणि या मारहाणीचा निषेध करण्यासाठी कामबंद आंदोलन सुरु आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 20, 2011 09:56 AM IST

रत्नागिरीत शांतता ; तबरेजचा मृतदेह ताब्यात घेतला

20 एप्रिल

जैतापूरमध्ये तब्बल 40 तासानंतर पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झालेल्या तबरेजचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला आहे. तबरेजच्या मृतदेहावर साखरीनाटे इथं दुपारी 2 वाजता दफनविधी होणार आहे. मच्छीमार समाजाच्या नेत्यांनी तबरेजच्या नातेवाईकांची समजूत काढली आणि त्यानंतर त्यांनी तबरेजचा मृतदेह ताब्यात घेतला.

सोमवारपासून पेटलेलं रत्नगिरीमधील वातावरण आता निवळायला लागलं आहे. इथं आज सकाळी 9 पर्यंत जमावबंदी होती. ती आता हटवण्यात आली आहे. आणि रत्नागिरीतील सगळे व्यवहार आता सुरळीत सुरू झालेत. 23 तारखेला तारापूर ते जैतापूर असा मार्च काढला जाणार आहे. त्यावेळेस पुढच्या आंदोलनाची दिशा ठरणार आहे.

दरम्यान, रत्नागिरी शासकीय रूग्णालयात कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. पोलीस गोळीबारात ठार झालेल्या तबरेजचा मृतदेह इथं ठेवण्यात आला होता. पोस्टमार्टमवरुन काल जमावाने हॉस्पिटलच्या कर्मचार्‍यांना मारहाण केली होती. आणि या मारहाणीचा निषेध करण्यासाठी कामबंद आंदोलन सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 20, 2011 09:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close