S M L

भारताची अवकाश संशोधनात भरारी ; रिसोर्स सॅटेलाईटचं यशस्वी प्रक्षेपण

20 एप्रिलभारताच्या अवकाश संशोधनात आज आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. भारताने आज पीएसएलव्ही-16 या रॉकेट लाँचरद्वारे रिसोर्स सॅट या सॅटेलाईटचं यशस्वी प्रक्षेपण केलं. श्रीहरीकोट्टाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन आज सकाळी हे प्रक्षेपण झालं. या प्रक्षेपणाद्वारे अवकाशात एकाच वेळेस तीन उपग्रह अवकाशात सोडण्यात आले. रिसोर्स सॅटेलाईट -2 रशियाचे युथसॅट आणि सिंगापूरचे एक्स- सॅट हे तीनही उपग्रह एकाच वेळेस अवकाशात सोडण्यात आले. या प्रक्षेपणानंतर श्रीहरीकोट्टामध्ये एकच जल्लोष झाला. 2011 मधील इस्रोचं हे पहिलं लाँचिंग आहे. 2010 मध्ये जीएसलीव्हीच्या प्रक्षेपणामध्ये अपयश आलं होतं. त्यानंतर आजच्या प्रक्षेपणाबद्दलही शंका व्यक्त केली जात होती. मात्र इस्रोच्या वैज्ञानिकांना आजच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल आत्मविश्वास होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 20, 2011 12:22 PM IST

भारताची अवकाश संशोधनात भरारी ; रिसोर्स सॅटेलाईटचं यशस्वी प्रक्षेपण

20 एप्रिल

भारताच्या अवकाश संशोधनात आज आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. भारताने आज पीएसएलव्ही-16 या रॉकेट लाँचरद्वारे रिसोर्स सॅट या सॅटेलाईटचं यशस्वी प्रक्षेपण केलं. श्रीहरीकोट्टाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन आज सकाळी हे प्रक्षेपण झालं. या प्रक्षेपणाद्वारे अवकाशात एकाच वेळेस तीन उपग्रह अवकाशात सोडण्यात आले.

रिसोर्स सॅटेलाईट -2 रशियाचे युथसॅट आणि सिंगापूरचे एक्स- सॅट हे तीनही उपग्रह एकाच वेळेस अवकाशात सोडण्यात आले. या प्रक्षेपणानंतर श्रीहरीकोट्टामध्ये एकच जल्लोष झाला. 2011 मधील इस्रोचं हे पहिलं लाँचिंग आहे. 2010 मध्ये जीएसलीव्हीच्या प्रक्षेपणामध्ये अपयश आलं होतं. त्यानंतर आजच्या प्रक्षेपणाबद्दलही शंका व्यक्त केली जात होती. मात्र इस्रोच्या वैज्ञानिकांना आजच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल आत्मविश्वास होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 20, 2011 12:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close