S M L

अजितदादांनी हात झटकले !

20 एप्रिलअजित पवार यांनी जलसंपदा मंत्री असताना त्यांचे शेअर्स असलेली ए.जी.मर्कंटाईल ही कंपनी पर्यटन विकासाच्या नावाखाली कशी लाभार्थी झाली हे आम्ही काल दाखवलं. आयबीएन लोकमतने केलेल्या गौप्यस्फोटानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार गप्पच बसले होते. पदाचा गैरवापर, निवडणूक कायद्याचा भंग आणि 2 जी घोटाळ्यातील आरोपी विनोद गोएंकाशी व्यावसायिक संबंध याचा पर्दाफाश आम्ही काल केला होता. विरोधकांनी त्यानंतर अजित पवार यांच्याच राजीनाम्याची मागणी केली. सभागृहाला उत्तर द्यावं अशी मागणीही विरोधकांनी लावून धरली होती. यावर ए.जी.मर्कंटाईल कंपनीशी माझा थेट संबंध नाही असाच पवित्रा दादांनी घेतला. एवढे कागदोपत्री पुरावे असताना, अजित पवार यांच्या नावावर 8800 इक्विटी शेअर्स असताना आपला थेट संबंध नाही असं अजित पवार कसं काय म्हणू शकतात हा महत्त्वाचा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. ए. जी. मर्कंटाईलचे इक्विटी होल्डर आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी या प्रकरणाचा खुलासा करण्याची मागणी भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आणि मग अजित पवारांना यावर उत्तर द्यावंच लागलं. अजित पवार म्हणतात, 'ए.जी.मर्कंटाईल कंपनीशी माझा थेट संबंध नाही. आपण ए. जी. मर्कंटाईल या कंपनीचे 30 एप्रिल 2005 मध्ये 8800 शेअर्स घेतले होते, पण 8 महिन्यांनंतर म्हणजे 17 नोव्हेबर 2005 रोजी ते शेअर्स विकले. त्यामुळे त्यावर कुठलाही टॅक्स पडला नाही. निवडणुका 2004 आणि 2009 साली झाल्या, त्या दोन्ही निवडणुकांच्या दरम्यान सगळा व्यवहार झाल्यामुळे निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये ही माहिती देण्याचा प्रश्नच नव्हता. आपण 6 जानेवारी 2006 ला कंपनी पासून वेगळे झालो. मी त्याची शहानिशा केली आहे. पण आता कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाच्या वेबसाईटवर काय आहे ते माझ्या सीएंना तपासून बघायला सांगतो आणि मग त्यांना सुधारणा करण्याबाबत सूचना केली आहे.' दादांचं शिवसेनेवर दबावतंत्र?'एक आणखी एक गोष्ट मला सांगायचीय, ठाकरे कुटुंबानेसुध्दा याच धरण परिसरात जमीन मागितली होती, जी त्यांना देण्यात आली. या जमिनीचा लीज कालावधी 2008 सालीच संपला आहे. ही जमीन बाळासाहेब ठाकरेंच्या दिवंगत पत्नी मीनाताई ठाकरे यांच्या नावावर आहे. या जमिनीचे रेकॉर्ड्स अजून बदललेले नाहीत. एकूण 1775 चौ.मी.एवढी ही जागा आहे. आपण शिवसेनेला याआधीच सांगितलंय की आम्ही याप्रकरणात कोणतंही राजकारण आम्ही करणार नाही. शिवसेनेनं अर्ज केला तर त्यांनाही 99 वर्षांचा लीज कालावधी वाढवून द्यायला सरकारला अडचण नाही.' - अजित पवार अजित पवारांनी सभागृहात जी सारवासारव केली त्यात कसं तथ्य नाही याचा हा पर्दाफाश.. अजित पवार यांचा पहिला दावा - ए.जी.मर्कंटाईल कंपनीचे शेअर्स 17 नोव्हेंबर 2005 सालीच विकले. आमच्याकडे जी कागदपत्रं आहेत ती बघितल्यावर दादांचा हा दावा साफ खोटा आहे हे लगेच लक्षात येतं. ए.जी.मर्कंटाईल कंपनीचा ऍन्युअल रिपोर्ट. 2007 सालच्या या कागदपत्रांमध्येसुध्दा अजित पवार यांच्याकडे 8800 इक्विटी शेअर्स असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. आता दादा तर म्हणतात 2005 सालीच शेअर्स विकले मग 2007 सालच्या कंपनीच्या ऍन्यअल रिपोर्टमध्ये अजित पवार यांच्या गुंतवणूकीचा स्पष्ट उल्लेख कसा काय ?अजित पवार यांचा दुसरा दावा - आपण 6 जानेवारी 2006 ला कंपनी पासून वेगळे झालो. आता शेअर्स विकले, वेगळे झाले पण मग 2006 साली संबंध तुटले तरी 2007 सालच्या अफन्युअल रिपोर्टमध्ये दादा तुमचं नाव कसं? याचाही उलगडा करा.अजित पवार यांचा तिसरा दावा - ए.जी.मर्कंटाईल कंपनीशी माझा थेट संबंध नाही. ज्या व्यक्तीकडे कंपनीचे सर्वात जास्त इक्विटी शेअर्स असताना तो आपला संबंध नाही हे कसं काय सांगू शकतो. बरं, अजित दादा, थेट संबंध नाही तर मग नेमका कोणत्या स्वरुपातला संबंध आहे.आज विधानसभेत हा सगळा मुद्दा उपस्थित करणार्‍या आमदार देवेद्र फडणवीस यांनी अजित पवार यांनी 2005 मध्ये शेअर्स विकले असतील तर मग कंपनी अफेअर्स खात्याच्या वेबसाईटवर अजित पवार 2006 , 2007 , 2009 मध्ये सुद्धा इक्विटी शेअर्स होल्डर आहेत. त्यामुळे त्यात सुधारणा करण्यासाठी अजित पवार काय करणार आहेत ? असा सवालही विचारला.अजितदादांच्या घोटाळ्याचं कॅलेंडर- नोव्हेंबर 2004 ते नोव्हेंबर 2010 - अजितदादा होते जलसंपदा मंत्री- 25 एप्रिल 2007 - ए.जी.मर्कंटाईल कंपनी आणि जलसंपदा खात्यामध्ये भाडेपट्टयाचा करार - 30 सप्टेंबर 2007 - ए.जी.मर्कंटाईल कंपनीच्या ऍन्युअल रिपोर्टमध्ये अजितदादांच्या शेअर्सचा स्पष्ट उल्लेख- 11 जानेवारी, 2006 - कंपनीशी संबंध संपला, अजितदादांनी केला दावातर अजित पवार यांनी 2005 मध्ये शेअर्स विकले असतील तर मग कंपनी अफेअर्स खात्याच्या वेबसाईटवर अजित पवार 2006 , 2007 , 2009 मध्ये सुद्धा इक्विटी शेअर्स होल्डर आहेत. त्यामुळे त्यात सुधारणा करण्यासाठी अजित पवार काय करणार आहेत ?असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 20, 2011 06:32 PM IST

अजितदादांनी हात झटकले !

20 एप्रिल

अजित पवार यांनी जलसंपदा मंत्री असताना त्यांचे शेअर्स असलेली ए.जी.मर्कंटाईल ही कंपनी पर्यटन विकासाच्या नावाखाली कशी लाभार्थी झाली हे आम्ही काल दाखवलं. आयबीएन लोकमतने केलेल्या गौप्यस्फोटानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार गप्पच बसले होते. पदाचा गैरवापर, निवडणूक कायद्याचा भंग आणि 2 जी घोटाळ्यातील आरोपी विनोद गोएंकाशी व्यावसायिक संबंध याचा पर्दाफाश आम्ही काल केला होता.

विरोधकांनी त्यानंतर अजित पवार यांच्याच राजीनाम्याची मागणी केली. सभागृहाला उत्तर द्यावं अशी मागणीही विरोधकांनी लावून धरली होती. यावर ए.जी.मर्कंटाईल कंपनीशी माझा थेट संबंध नाही असाच पवित्रा दादांनी घेतला. एवढे कागदोपत्री पुरावे असताना, अजित पवार यांच्या नावावर 8800 इक्विटी शेअर्स असताना आपला थेट संबंध नाही असं अजित पवार कसं काय म्हणू शकतात हा महत्त्वाचा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. ए. जी. मर्कंटाईलचे इक्विटी होल्डर आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी या प्रकरणाचा खुलासा करण्याची मागणी भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आणि मग अजित पवारांना यावर उत्तर द्यावंच लागलं. अजित पवार म्हणतात, 'ए.जी.मर्कंटाईल कंपनीशी माझा थेट संबंध नाही. आपण ए. जी. मर्कंटाईल या कंपनीचे 30 एप्रिल 2005 मध्ये 8800 शेअर्स घेतले होते, पण 8 महिन्यांनंतर म्हणजे 17 नोव्हेबर 2005 रोजी ते शेअर्स विकले. त्यामुळे त्यावर कुठलाही टॅक्स पडला नाही.

निवडणुका 2004 आणि 2009 साली झाल्या, त्या दोन्ही निवडणुकांच्या दरम्यान सगळा व्यवहार झाल्यामुळे निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये ही माहिती देण्याचा प्रश्नच नव्हता. आपण 6 जानेवारी 2006 ला कंपनी पासून वेगळे झालो. मी त्याची शहानिशा केली आहे. पण आता कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाच्या वेबसाईटवर काय आहे ते माझ्या सीएंना तपासून बघायला सांगतो आणि मग त्यांना सुधारणा करण्याबाबत सूचना केली आहे.'

दादांचं शिवसेनेवर दबावतंत्र?

'एक आणखी एक गोष्ट मला सांगायचीय, ठाकरे कुटुंबानेसुध्दा याच धरण परिसरात जमीन मागितली होती, जी त्यांना देण्यात आली. या जमिनीचा लीज कालावधी 2008 सालीच संपला आहे. ही जमीन बाळासाहेब ठाकरेंच्या दिवंगत पत्नी मीनाताई ठाकरे यांच्या नावावर आहे. या जमिनीचे रेकॉर्ड्स अजून बदललेले नाहीत. एकूण 1775 चौ.मी.एवढी ही जागा आहे. आपण शिवसेनेला याआधीच सांगितलंय की आम्ही याप्रकरणात कोणतंही राजकारण आम्ही करणार नाही. शिवसेनेनं अर्ज केला तर त्यांनाही 99 वर्षांचा लीज कालावधी वाढवून द्यायला सरकारला अडचण नाही.' - अजित पवार

अजित पवारांनी सभागृहात जी सारवासारव केली त्यात कसं तथ्य नाही याचा हा पर्दाफाश..

अजित पवार यांचा पहिला दावा - ए.जी.मर्कंटाईल कंपनीचे शेअर्स 17 नोव्हेंबर 2005 सालीच विकले. आमच्याकडे जी कागदपत्रं आहेत ती बघितल्यावर दादांचा हा दावा साफ खोटा आहे हे लगेच लक्षात येतं. ए.जी.मर्कंटाईल कंपनीचा ऍन्युअल रिपोर्ट. 2007 सालच्या या कागदपत्रांमध्येसुध्दा अजित पवार यांच्याकडे 8800 इक्विटी शेअर्स असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. आता दादा तर म्हणतात 2005 सालीच शेअर्स विकले मग 2007 सालच्या कंपनीच्या ऍन्यअल रिपोर्टमध्ये अजित पवार यांच्या गुंतवणूकीचा स्पष्ट उल्लेख कसा काय ?

अजित पवार यांचा दुसरा दावा - आपण 6 जानेवारी 2006 ला कंपनी पासून वेगळे झालो. आता शेअर्स विकले, वेगळे झाले पण मग 2006 साली संबंध तुटले तरी 2007 सालच्या अफन्युअल रिपोर्टमध्ये दादा तुमचं नाव कसं? याचाही उलगडा करा.

अजित पवार यांचा तिसरा दावा - ए.जी.मर्कंटाईल कंपनीशी माझा थेट संबंध नाही. ज्या व्यक्तीकडे कंपनीचे सर्वात जास्त इक्विटी शेअर्स असताना तो आपला संबंध नाही हे कसं काय सांगू शकतो. बरं, अजित दादा, थेट संबंध नाही तर मग नेमका कोणत्या स्वरुपातला संबंध आहे.

आज विधानसभेत हा सगळा मुद्दा उपस्थित करणार्‍या आमदार देवेद्र फडणवीस यांनी अजित पवार यांनी 2005 मध्ये शेअर्स विकले असतील तर मग कंपनी अफेअर्स खात्याच्या वेबसाईटवर अजित पवार 2006 , 2007 , 2009 मध्ये सुद्धा इक्विटी शेअर्स होल्डर आहेत. त्यामुळे त्यात सुधारणा करण्यासाठी अजित पवार काय करणार आहेत ? असा सवालही विचारला.

अजितदादांच्या घोटाळ्याचं कॅलेंडर

- नोव्हेंबर 2004 ते नोव्हेंबर 2010 - अजितदादा होते जलसंपदा मंत्री- 25 एप्रिल 2007 - ए.जी.मर्कंटाईल कंपनी आणि जलसंपदा खात्यामध्ये भाडेपट्टयाचा करार - 30 सप्टेंबर 2007 - ए.जी.मर्कंटाईल कंपनीच्या ऍन्युअल रिपोर्टमध्ये अजितदादांच्या शेअर्सचा स्पष्ट उल्लेख- 11 जानेवारी, 2006 - कंपनीशी संबंध संपला, अजितदादांनी केला दावा

तर अजित पवार यांनी 2005 मध्ये शेअर्स विकले असतील तर मग कंपनी अफेअर्स खात्याच्या वेबसाईटवर अजित पवार 2006 , 2007 , 2009 मध्ये सुद्धा इक्विटी शेअर्स होल्डर आहेत. त्यामुळे त्यात सुधारणा करण्यासाठी अजित पवार काय करणार आहेत ?असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 20, 2011 06:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close