S M L

शिवसेनेच्या उमेदवाराचे मतदान यादीतून नाव गायब

03 जानेवारीनाशिकमध्ये शिवसेनेच्या उमेदवार सपना मगर यांचं नावच मतदार यादीतून गायब झाल्याची पक्षाची तक्रार आहे. याबाबत वेळोवेळी अर्ज विनंत्या करुनही प्रशासन दाद देत नाही. त्यामुळे शेवटी त्यांच्या समर्थकांनी नाशिक महापालिकेच्या पायर्‍यांवरच ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. मगर यांचे नाव प्रारुप मतदार यादीत होतं, मात्र त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या अंतिम यादीतून गायब झालं आहे. यासाठी संबंधितांनी कोर्टापासून निवडणूक आयोगापर्यंत दाद मागितली, मात्र नाशिक महापालिका प्रशासन दाद देत नसल्याची त्यांची तक्रार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 3, 2012 08:22 AM IST

03 जानेवारी

नाशिकमध्ये शिवसेनेच्या उमेदवार सपना मगर यांचं नावच मतदार यादीतून गायब झाल्याची पक्षाची तक्रार आहे. याबाबत वेळोवेळी अर्ज विनंत्या करुनही प्रशासन दाद देत नाही. त्यामुळे शेवटी त्यांच्या समर्थकांनी नाशिक महापालिकेच्या पायर्‍यांवरच ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. मगर यांचे नाव प्रारुप मतदार यादीत होतं, मात्र त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या अंतिम यादीतून गायब झालं आहे. यासाठी संबंधितांनी कोर्टापासून निवडणूक आयोगापर्यंत दाद मागितली, मात्र नाशिक महापालिका प्रशासन दाद देत नसल्याची त्यांची तक्रार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 3, 2012 08:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close