S M L

हुश्श..जिंकलो बाबा एकदाचं !

03 फेब्रुवारीऑस्ट्रेलियात टेस्टमध्ये लाजिरवाना व्हाईटवॉश पचवून टी-20 च्या मैदानात दोन हात करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाला पहिल्याच सामान्यात पराभवाचे तोंड पाहावे लागेल. आणि दुसर्‍या सामान्यात 132 धावांचा पाठलाग करत 8 विकेट राखून टीमने विजयाचा नारळ फोडला. मेलबर्न टी-20 मॅचमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 8 विकेटनं पराभव केला. टॉस जिंकून पहिली बॅटिंग करणार्‍या ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 132 रन्सचे आव्हान ठेवलं होतं. दमदार बॉलिंग आणि चपळ फिल्डिंगच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाची इनिंग 131 रन्सवर गुंडाळली. प्रवीण कुमार आणि रोहित शर्माने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर ऑस्ट्रेलियाचे तब्बल 4 बॅट्समन रनआऊट आले. याला उत्तर देताना विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर या भारताच्या ओपनिंग जोडीने दमदार सुरुवात केली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 43 रन्सची पार्टनरशिप केली. सेहवाग 23 रन्स करुन आऊट झाला. तर विराट कोहलीने 31 रन्स केले. यानंतर मात्र गौतम गंभीर आणि कॅप्टन महेंद्रसिंग धोणीने आणखी पडझड होऊ न देता भारताच्या पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. गंभीरने नॉटआऊट 56 रन्स केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 3, 2012 12:48 PM IST

हुश्श..जिंकलो बाबा एकदाचं !

03 फेब्रुवारी

ऑस्ट्रेलियात टेस्टमध्ये लाजिरवाना व्हाईटवॉश पचवून टी-20 च्या मैदानात दोन हात करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाला पहिल्याच सामान्यात पराभवाचे तोंड पाहावे लागेल. आणि दुसर्‍या सामान्यात 132 धावांचा पाठलाग करत 8 विकेट राखून टीमने विजयाचा नारळ फोडला. मेलबर्न टी-20 मॅचमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 8 विकेटनं पराभव केला. टॉस जिंकून पहिली बॅटिंग करणार्‍या ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 132 रन्सचे आव्हान ठेवलं होतं. दमदार बॉलिंग आणि चपळ फिल्डिंगच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाची इनिंग 131 रन्सवर गुंडाळली. प्रवीण कुमार आणि रोहित शर्माने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर ऑस्ट्रेलियाचे तब्बल 4 बॅट्समन रनआऊट आले. याला उत्तर देताना विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर या भारताच्या ओपनिंग जोडीने दमदार सुरुवात केली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 43 रन्सची पार्टनरशिप केली. सेहवाग 23 रन्स करुन आऊट झाला. तर विराट कोहलीने 31 रन्स केले. यानंतर मात्र गौतम गंभीर आणि कॅप्टन महेंद्रसिंग धोणीने आणखी पडझड होऊ न देता भारताच्या पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. गंभीरने नॉटआऊट 56 रन्स केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 3, 2012 12:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close