S M L

हॅलो..मी मतदारराजा बोलतोय !

शची मराठे, मुंबई04 फेब्रुवारीमतदानाबद्दल अनेकदा सामान्य मतदारांना अपुरी माहिती असते आणि बर्‍याचं वेळा उमेदवारांना देखील. मतदारांसाठी व्होटिंग आयडी, उमेदवारांसाठी आचारसंहिता, प्रचार मोहिम या सगळ्यांबद्दल माहिती मिळवणे आता शक्य झाले आहे आणि तेही एका फोन कॉलमुळे...युनिक ग्लोबल फाउंडेशन या संस्थेतर्फे 'मतदान हेल्पलाईन' सुरु झालीय जिथं मतदानासंबंधी 'A to Z' माहिती मिळणारे...मतदान हेल्पलाईनच्या कार्यकर्त्या प्रियांका टिकवडे म्हणतात, व्होटिंग आय कार्ड नाही, आमचा वॉर्ड एक आहे आणि आता आम्ही दुसर्‍या वॉर्डमध्ये राहतो. तर सल्लागार सुनिता गोडबोले म्हणतात, कोर्ड ऑफ कंडक्टमध्ये त्याचं ऑफिस 10 वाजेपर्यंत सुरु आहे मग काय करायचं, किंवा रॅली काढताना दुसर्‍याची मध्ये आली तर काय करणार ?उमेदवार आणि मतदारांचे असंख्य प्रश्न...आणि जवळपास एका मिनिटाला 2 या वेगानं येणारे फोन कॉल्स...युनिक ग्लोबल फाउंडेशनच्या या 'मतदान हेल्पलाईन'ला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. निवडणुकीबद्दलची कोणतीही माहिती हवी असेल तर तुम्ही 022 2437 7230 / 022 24377331 या नंबरवर सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत फोन करु शकता. मनातल्या सगळ्या शंका, प्रश्न दुर होऊन जास्तीत जास्त लोकांनी मतदानाचा हक्क बजावावा हाच या हेल्पलाईनमागचा हेतू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 4, 2012 09:53 AM IST

हॅलो..मी मतदारराजा बोलतोय !

शची मराठे, मुंबई

04 फेब्रुवारी

मतदानाबद्दल अनेकदा सामान्य मतदारांना अपुरी माहिती असते आणि बर्‍याचं वेळा उमेदवारांना देखील. मतदारांसाठी व्होटिंग आयडी, उमेदवारांसाठी आचारसंहिता, प्रचार मोहिम या सगळ्यांबद्दल माहिती मिळवणे आता शक्य झाले आहे आणि तेही एका फोन कॉलमुळे...युनिक ग्लोबल फाउंडेशन या संस्थेतर्फे 'मतदान हेल्पलाईन' सुरु झालीय जिथं मतदानासंबंधी 'A to Z' माहिती मिळणारे...

मतदान हेल्पलाईनच्या कार्यकर्त्या प्रियांका टिकवडे म्हणतात, व्होटिंग आय कार्ड नाही, आमचा वॉर्ड एक आहे आणि आता आम्ही दुसर्‍या वॉर्डमध्ये राहतो. तर सल्लागार सुनिता गोडबोले म्हणतात, कोर्ड ऑफ कंडक्टमध्ये त्याचं ऑफिस 10 वाजेपर्यंत सुरु आहे मग काय करायचं, किंवा रॅली काढताना दुसर्‍याची मध्ये आली तर काय करणार ?

उमेदवार आणि मतदारांचे असंख्य प्रश्न...आणि जवळपास एका मिनिटाला 2 या वेगानं येणारे फोन कॉल्स...युनिक ग्लोबल फाउंडेशनच्या या 'मतदान हेल्पलाईन'ला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय.

निवडणुकीबद्दलची कोणतीही माहिती हवी असेल तर तुम्ही 022 2437 7230 / 022 24377331 या नंबरवर सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत फोन करु शकता. मनातल्या सगळ्या शंका, प्रश्न दुर होऊन जास्तीत जास्त लोकांनी मतदानाचा हक्क बजावावा हाच या हेल्पलाईनमागचा हेतू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 4, 2012 09:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close