S M L

नागपुरात काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की

04 फेब्रुवारीनागपूरमध्ये एबी फॉर्मवरुन काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली. नागपूरमध्ये एबी फॉर्म वाटप सुरु असतांना महिला कार्यकर्त्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला. तिकीट वाटपामध्ये निष्ठावान महिला कार्यकर्त्याना डावलण्यात आल्याप्रकरणी जाब विचारण्यासाठी या महिला कार्यालयात धडकल्या. पैसे घेवून तिकीट वाटपाचा आरोप करत माजी शहराध्यक्ष कांता पराते यांनी विलास मुत्तेमवार समर्थक गजानन हाटेवार यांना मारहाण केली. महत्वाचे म्हणजे पक्ष निरीक्षक रोहिदास पाटील यांच्यापुढचे ही फ्री स्टाईल सुरु होती. निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून केवळ पैसा घेवून तिकीट वाटण्यात आल्याचा आरोप कांता पराते यांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 4, 2012 03:57 PM IST

नागपुरात काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की

04 फेब्रुवारी

नागपूरमध्ये एबी फॉर्मवरुन काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली. नागपूरमध्ये एबी फॉर्म वाटप सुरु असतांना महिला कार्यकर्त्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला. तिकीट वाटपामध्ये निष्ठावान महिला कार्यकर्त्याना डावलण्यात आल्याप्रकरणी जाब विचारण्यासाठी या महिला कार्यालयात धडकल्या. पैसे घेवून तिकीट वाटपाचा आरोप करत माजी शहराध्यक्ष कांता पराते यांनी विलास मुत्तेमवार समर्थक गजानन हाटेवार यांना मारहाण केली. महत्वाचे म्हणजे पक्ष निरीक्षक रोहिदास पाटील यांच्यापुढचे ही फ्री स्टाईल सुरु होती. निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून केवळ पैसा घेवून तिकीट वाटण्यात आल्याचा आरोप कांता पराते यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 4, 2012 03:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close