S M L

निवडणुकीत लढतींचे चित्र स्पष्ट ; 2,233 उमेदवार मैदानात

06 फेब्रुवारीमुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत उलटल्यानंतर आता लढतींचे चित्र स्पष्ट झालं आहे. या निवडणुकीत एकूण 227 वॉर्डांमध्ये 2 हजार 233 उमेदवार रिंगणार असतील. तर सर्वाधिक 33 उमेदवार वॉर्ड नं. 138 मध्ये आहेत. तर 17 वॉर्डांमध्ये तिरंगी लढत होणार आहे. तर 24 वॉर्डांमध्ये चौरंगी लढत होणार आहे. महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट झालं असलं तरी सगळ्याच पक्षांना बंडखोरांच्या समस्येचं आव्हान आहे. मुंबईत सर्वाधिक बंडखोरी झाली आहे ती काँग्रेसमध्ये. काँग्रेस - एकूण उमेदवार -169 - बंडखोर- 40 काँग्रेसमध्ये बंडखोरांची सर्वात जास्त संख्या आहे. अंदाजे 40 जणांनी बंडखोरी केलीय. ताकद असलेल्या काही जणांनी अपक्ष म्हणून तर काही जणांनी थेट दुसर्‍या पक्षामध्ये जावून उमेदवारी मिळवली आहे.राष्ट्रवादी - एकूण उमेदवार -58 - बंडखोर- 09शिवसेना - एकूण उमेदवार- 135 - बंडखोर- 09महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे 135 उमेदवार रिंगणात आहेत, यावेळी शिवसेनेला बंडखोरीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे 8 ते 9 बंडखोर रिंगणात आहेत.प्रमुख बंडखोर - वॉर्ड क्रमांक 134 मधून राहुल शेवाळेंविरोधात तात्या सारंग, 218 मध्ये संजोग ठाकूर यांच्या विरोधात राजू काळे , 183 मध्ये मिलिंद वैद्य विरोधात अर्जुन नाईक, तर 122 मध्ये कोमल शिर्के विरोधात राजा चौगुले तर136 मध्ये मंजु कुमरे विरोधात सुनीता कोळी यांनी बंड केलं आहे.भाजप- एकूण उमेदवार- 63 - बंडखोर-05 भाजपचे 63 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपलाही बंडखोर डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. 4 ते 5 ठिकाणी बंडखोरांचा सामना करावा लागतोय. वॉर्ड क्रमांक 80 मध्ये ज्योती अळवणी यांनी बंडखोरी केलीय तर मुलुंड-भांडुप विकास आघाडीच्या नावावर विश्वनाथ म्हस्के यांनी 5 उमेदवार उभे केले.आरपीआय- एकूण उमेदवार- 29 -बंडखोर- 07मनसे -एकूण उमेदवार- 225 -बंडखोर- 04मनसेच 225 उमेदवार रिंगणात आहेत त्यात 4 जणांनी बंडखोरी केली आहे. पक्ष नवा असल्याने नेत्यांना बंडखोरी रोखण्यात बर्‍याच प्रमाणात यश आलंय असं म्हणता येईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 6, 2012 09:14 AM IST

निवडणुकीत लढतींचे चित्र स्पष्ट ; 2,233 उमेदवार मैदानात

06 फेब्रुवारी

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत उलटल्यानंतर आता लढतींचे चित्र स्पष्ट झालं आहे. या निवडणुकीत एकूण 227 वॉर्डांमध्ये 2 हजार 233 उमेदवार रिंगणार असतील. तर सर्वाधिक 33 उमेदवार वॉर्ड नं. 138 मध्ये आहेत. तर 17 वॉर्डांमध्ये तिरंगी लढत होणार आहे. तर 24 वॉर्डांमध्ये चौरंगी लढत होणार आहे.

महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट झालं असलं तरी सगळ्याच पक्षांना बंडखोरांच्या समस्येचं आव्हान आहे. मुंबईत सर्वाधिक बंडखोरी झाली आहे ती काँग्रेसमध्ये. काँग्रेस - एकूण उमेदवार -169 - बंडखोर- 40 काँग्रेसमध्ये बंडखोरांची सर्वात जास्त संख्या आहे. अंदाजे 40 जणांनी बंडखोरी केलीय. ताकद असलेल्या काही जणांनी अपक्ष म्हणून तर काही जणांनी थेट दुसर्‍या पक्षामध्ये जावून उमेदवारी मिळवली आहे.राष्ट्रवादी - एकूण उमेदवार -58 - बंडखोर- 09शिवसेना - एकूण उमेदवार- 135 - बंडखोर- 09महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे 135 उमेदवार रिंगणात आहेत, यावेळी शिवसेनेला बंडखोरीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे 8 ते 9 बंडखोर रिंगणात आहेत.प्रमुख बंडखोर - वॉर्ड क्रमांक 134 मधून राहुल शेवाळेंविरोधात तात्या सारंग, 218 मध्ये संजोग ठाकूर यांच्या विरोधात राजू काळे , 183 मध्ये मिलिंद वैद्य विरोधात अर्जुन नाईक, तर 122 मध्ये कोमल शिर्के विरोधात राजा चौगुले तर136 मध्ये मंजु कुमरे विरोधात सुनीता कोळी यांनी बंड केलं आहे.भाजप- एकूण उमेदवार- 63 - बंडखोर-05 भाजपचे 63 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपलाही बंडखोर डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. 4 ते 5 ठिकाणी बंडखोरांचा सामना करावा लागतोय. वॉर्ड क्रमांक 80 मध्ये ज्योती अळवणी यांनी बंडखोरी केलीय तर मुलुंड-भांडुप विकास आघाडीच्या नावावर विश्वनाथ म्हस्के यांनी 5 उमेदवार उभे केले.

आरपीआय- एकूण उमेदवार- 29 -बंडखोर- 07

मनसे -एकूण उमेदवार- 225 -बंडखोर- 04मनसेच 225 उमेदवार रिंगणात आहेत त्यात 4 जणांनी बंडखोरी केली आहे. पक्ष नवा असल्याने नेत्यांना बंडखोरी रोखण्यात बर्‍याच प्रमाणात यश आलंय असं म्हणता येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 6, 2012 09:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close