S M L

युवराजचा कॅन्सर बरा होण्यासारखा

06 फेब्रुवारीभारताचा तडाखेबाज,धडाकेबाज फलंदाज युवराज सिंगला कॅन्सर झाल्यामुळे अमेरिकेत उपचार सुरु आहेत हे कळल्यावर कालपासून त्याच्या फॅन्सना धक्का बसला. पण बीसीसीआयने आज अधिकृत पत्रक काढून युवराज उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याचं स्पष्ट केलं आहे. युवराजच्या कॅन्सरचे नेमकं स्वरुपही आता कळले आहे. युवराजच्या आजाराला 'मीडियास्टिनल सेमिनोमा' असं म्हणतात. आणि हा आजार पूर्णपणे बरा होण्यासारखा आहे अशी खात्रीच डॉक्टरनी दिली आहे. युवराज काही महिन्यातच नेहमीसारखे क्रिकेट खेळू शकेल असंही डॉक्टरचं म्हणणं आहे. किमोथेरपीचं तिसरं सेशन येत्या बुधवारी सुरु होणार आहे. युवराज सध्या अमेरिकन सायकलपटू लान्स आर्मस्ट्राँगचं चरित्र वाचतोय. आर्मस्ट्राँगने दोनवेळा कॅन्सरशी लढा दिल्यावर सलग सातवेळा टूअर दी फ्रान्स ही प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकली होती. या पुस्तकातून आपल्याला प्रेरणा मिळाल्याचं युवराजचं म्हणणं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 6, 2012 09:31 AM IST

युवराजचा कॅन्सर बरा होण्यासारखा

06 फेब्रुवारी

भारताचा तडाखेबाज,धडाकेबाज फलंदाज युवराज सिंगला कॅन्सर झाल्यामुळे अमेरिकेत उपचार सुरु आहेत हे कळल्यावर कालपासून त्याच्या फॅन्सना धक्का बसला. पण बीसीसीआयने आज अधिकृत पत्रक काढून युवराज उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याचं स्पष्ट केलं आहे. युवराजच्या कॅन्सरचे नेमकं स्वरुपही आता कळले आहे. युवराजच्या आजाराला 'मीडियास्टिनल सेमिनोमा' असं म्हणतात. आणि हा आजार पूर्णपणे बरा होण्यासारखा आहे अशी खात्रीच डॉक्टरनी दिली आहे. युवराज काही महिन्यातच नेहमीसारखे क्रिकेट खेळू शकेल असंही डॉक्टरचं म्हणणं आहे. किमोथेरपीचं तिसरं सेशन येत्या बुधवारी सुरु होणार आहे. युवराज सध्या अमेरिकन सायकलपटू लान्स आर्मस्ट्राँगचं चरित्र वाचतोय. आर्मस्ट्राँगने दोनवेळा कॅन्सरशी लढा दिल्यावर सलग सातवेळा टूअर दी फ्रान्स ही प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकली होती. या पुस्तकातून आपल्याला प्रेरणा मिळाल्याचं युवराजचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 6, 2012 09:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close