S M L

मराठी पाट्या लावण्याची बेळगाववासियांची मोहिम

06 फेब्रुवारीबेळगावमध्ये मराठीचा लढा देणार्‍या बेळगाववासियांनी एक नवी मोहीम सुरू केली आहे. मराठीची होणारी गळचेपी थांबवण्यासाठी बेळगावमधल्या एका मंडळाने घरांवर मराठी नामफलक लावायला सुरुवात केली आहे. घरावरच्या पाट्या, चौकातील फलक मराठीत लावण्याचा उपक्रम बेळगाव शहरातल्या कालिकादेवी युवक मंडळाने सुरू केला आहे. या उपक्रमला नागरिकांनी मोठ्याप्रमाणावर प्रतिसाद दिला आहे. काही दिवसांपुर्वी बेळगावमध्ये काळा दिनात महापौर आणि उपमहापौर यांनी सहभाग घेतल्यामुळे कर्नाटक सरकारने त्यांना निलंबित केले तसेच महापालिकाही बरखास्त करण्यात आली. आता पुन्हा एकदा बेळगावचा मराठी माणूस रस्त्यावर उतरला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2013 03:57 PM IST

मराठी पाट्या लावण्याची बेळगाववासियांची मोहिम

06 फेब्रुवारी

बेळगावमध्ये मराठीचा लढा देणार्‍या बेळगाववासियांनी एक नवी मोहीम सुरू केली आहे. मराठीची होणारी गळचेपी थांबवण्यासाठी बेळगावमधल्या एका मंडळाने घरांवर मराठी नामफलक लावायला सुरुवात केली आहे. घरावरच्या पाट्या, चौकातील फलक मराठीत लावण्याचा उपक्रम बेळगाव शहरातल्या कालिकादेवी युवक मंडळाने सुरू केला आहे. या उपक्रमला नागरिकांनी मोठ्याप्रमाणावर प्रतिसाद दिला आहे. काही दिवसांपुर्वी बेळगावमध्ये काळा दिनात महापौर आणि उपमहापौर यांनी सहभाग घेतल्यामुळे कर्नाटक सरकारने त्यांना निलंबित केले तसेच महापालिकाही बरखास्त करण्यात आली. आता पुन्हा एकदा बेळगावचा मराठी माणूस रस्त्यावर उतरला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 6, 2012 10:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close