S M L

आता तळीरामांसाठी होम डिलिव्हरी सर्व्हिस

31 डिसेंबर, मुंबईऋतुजा मोरेथर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन आज जोरदार असणार आहे . पिओ पिलाओ मौज मनाओ हे या सेलिब्रेशनचं प्रमुख सूत्र. 1 जानेवारीची पहाट झाल्यावरच समजत की थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन किती जोरदार होतं. मद्याचा यथेच्छ सहारा घेणार्‍या अशा मनुष्यप्राण्यांसाठी काही कंपन्यांनी खास होम डिलिव्हरी पॅकेज काढलं आहे.डोळ्यांसमोर दोन-दोन माणसं दिसतायत... किंवाघराकडे जाणारा रस्ताच सापडत नाहीये आणि स्वतः कुठल्या जागी आहोत हेही सांगता येत नाहीये... अशी स्थिती एकतीस डिसेंबरच्या रात्री बहुतेकांचीच होण्याचा संभव आहे. अर्थात कारण एकच. पार्टीचा हँगओव्हर! पण काळजी करु नका. तुम्हाला जास्तच झाली असेल तर स्वत:ला सोपवा पार्टी हार्डच्या प्रतिनिधींच्या हाती आणि निर्धास्त घरी पोचा. कारण न्यू ईयरच्या निमित्तानं पार्टी हार्ड या संस्थेनं बीपीएल मोबाईलच्या मदतीनं रिच होम सेफली ही अफलातून कल्पना राबवली आहे.तुम्हांला तुमच्या गाडीसकट घ्यायला एक स्पेशल ड्रायव्हर येईल पण या पार्टीच्या हँगओव्हरमध्ये तुम्ही तुमच्या घराचा पत्ता नीट सांगणंही तेवढंच जरूरी आहे. अर्थात ही सेवा फुकट मात्र नाहीये. यासाठी रात्री दहा ते तीन या वेळेत पाचशे रुपये आकारले जातील. तर त्यानंतरच्या प्रत्येक तासासाठी द्यावे लागतील पन्नास रुपये एक्स्ट्रॉ. त्यामुळं सुखरुप घरी पोचवण्याचं वचन देणार्‍या या कंपन्या आता 31 डिसेंबरची पार्टी कॅश करण्यावरही डोळा ठेवून आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 31, 2008 09:11 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 31, 2008 09:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close