S M L

नागपूरमधलं बाबा आमटेंच्या जीवनप्रवासाचं प्रदर्शन

31 डिसेंबर, नागपूर प्रशांत कोरटकर 26 डिसेंबर हा डॉ. बाबा आमटेंचा 94वा जन्मदिवस. त्यानिमित्तानं नागपूरचे फोटोग्राफर शेखर सोनी यांनी बाबा आमटेंच्या जीवनप्रवासातल्या 94 छायाचित्रांचं प्रदर्शन भरवलं आहे. हे प्रदर्शन पाहताना बाबांचा जीवनप्रवास डोळ्यांसमोर उभा राहतो. वेदनेच्या गर्द रानातही आनंदवन फुलवणार्‍या बाबा आमटे या महाकर्मयोग्याचा जीवनपट नागपूरच्या रविंद्रनाथ टागोर आर्ट गॅलरीत भिंतीवर सजवण्यात आला आहे. आभाळाएवढं काम करतानाही आपल्या साध्या राहणीमुळं बाबा प्रत्येकाला आपल्या घरातल्याप्रमाणेच वाटायचे. हेच प्रदर्शनातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, ' अशी माहिती छायाचित्रकार शेखर सोनी यांनी दिली. प्रदर्शनात लावण्यात आलेल्या 94 फोटोंमध्ये कोणती ना कोणती घटना जोडलेली आहे. मग जे आर डी टाटांची भेट, दलाईलामांची आनंदवन भेट , तस्ंाच मुलांमध्ये रमणारे बाबा...असे बाबांच्या जीवनाचे बरेचसे मूड या प्रदर्शनात पहायाल मिळतात. " बाबांचे फोटो पाहताना एक प्रकारची पॉझिटीव्ह एनर्जी मिळत असल्याची माहिती भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी दिली. बोल अखेरचे ते आलो इथे रिकामा, सप्रेम द्या निरोप जात आहे... या आरती प्रभूंच्या ओळी बाबांचं प्रदर्शन पाहताना ख-या झाल्यासारख्या वाटतात. मग बाबा आमटंेना साधनाताइंर्ची साथ या छायाचित्रात पहायला मिळते, तसंच नर्मदा बचाओ आंदोलन असो की विनोबांचं भुदान आंदोलन , प्रत्येकात बाबांचा पुढाकारही यात पहायला मिळतो. बाबांनी दिलेला भारत जोडोचा मंत्र आजही तरुणांना स्फूर्ती देणारा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 31, 2008 10:27 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 31, 2008 10:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close