S M L
  • एलबीटीबाबत माघार नाहीच -मुख्यमंत्री

    Published On: May 10, 2013 11:26 AM IST | Updated On: May 11, 2013 01:54 PM IST

    10 मेएलबीटीबाबत माघार घेतली जाणार नाही असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही स्पष्ट केलंय. हा निर्णय आघाडी सरकारचा आहे. माझा एकट्याचा नाही, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. सर्वांशी चर्चा करूनच 2009 मध्ये एलबीटीचा निर्णय घेण्यात आला होता याची आठवणही मुख्यमंत्र्यांनी करून दिली. मुंबईत अजून एलबीटी लागू नाही, सर्वांशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. आज सुप्रीम कोर्टाने एलबीटीला स्थगिती द्यायला नकार दिला. त्यामुळे एलबीटीची अंमलबजावणी सध्या कायम राहणार आहे. हा मुद्दा सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाकडे सोपवलाय. चार महिन्यांत एलबीटीची याचिका निकालात काढा असे निर्देश सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाला दिले आहेत.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close