S M L

ठाण्यातील बेकायदा बांधकाम पाडा पण...-शरद पवार

26 एप्रिलठाण्यातल्या बेकायदा बांधकामाबद्दल केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. बेकायदा बांधकामांबाबत सरकारनं लवकरच भूमिका जाहीर करावी. बेकायदा बांधकामांविरूध्द कारवाई सुरूच ठेवा मात्र हे करताना सामान्य नागरिकांची काळजी घ्या असं शरद पवारांनी या पत्रात स्पष्ट केलं आहे. या अगोदरही शरद पवारांनी ठाण्यातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवावा आणि ते बांधकाम आमच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे जरी असले तरी कारवाई करावी अशी सुचना पवारांनी दिली होती. आज शरद पवार आज मंत्र्यांची बैठक घेत आहेत. अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर ही बैठक सुरू आहे. बैठकीला केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेलसुद्धा उपस्थित आहेत. पाण्याची तीव्र टंचाई, प्रमाणाबाहेर वाढलेलं लोडशेडिंग, महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना, प्राध्यापकांचा चिघळलेला संप आणि अजित पवारांच्या वक्त्यव्याच्या निमित्तानं राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची कामगिरी चर्चेत आलीय. त्यामुळं सर्व मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड आज स्वत: शरद पवार तपासणार आहेत. तसंच आगामी काळात पक्षात आणि मंत्रिमंडळात काही फेरबदल करून पक्षातली मरगळ झटकण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शरद पवार उद्या वरिष्ठ नेते आणि पदाधिकार्‍यांची बैठक घेणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 26, 2013 01:27 PM IST

ठाण्यातील बेकायदा बांधकाम पाडा पण...-शरद पवार

26 एप्रिल

ठाण्यातल्या बेकायदा बांधकामाबद्दल केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. बेकायदा बांधकामांबाबत सरकारनं लवकरच भूमिका जाहीर करावी. बेकायदा बांधकामांविरूध्द कारवाई सुरूच ठेवा मात्र हे करताना सामान्य नागरिकांची काळजी घ्या असं शरद पवारांनी या पत्रात स्पष्ट केलं आहे. या अगोदरही शरद पवारांनी ठाण्यातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवावा आणि ते बांधकाम आमच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे जरी असले तरी कारवाई करावी अशी सुचना पवारांनी दिली होती.

आज शरद पवार आज मंत्र्यांची बैठक घेत आहेत. अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर ही बैठक सुरू आहे. बैठकीला केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेलसुद्धा उपस्थित आहेत. पाण्याची तीव्र टंचाई, प्रमाणाबाहेर वाढलेलं लोडशेडिंग, महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना, प्राध्यापकांचा चिघळलेला संप आणि अजित पवारांच्या वक्त्यव्याच्या निमित्तानं राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची कामगिरी चर्चेत आलीय. त्यामुळं सर्व मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड आज स्वत: शरद पवार तपासणार आहेत. तसंच आगामी काळात पक्षात आणि मंत्रिमंडळात काही फेरबदल करून पक्षातली मरगळ झटकण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शरद पवार उद्या वरिष्ठ नेते आणि पदाधिकार्‍यांची बैठक घेणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 26, 2013 01:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close