S M L

सीरियल किलर रवींद्र कंट्रोलेला जन्मठेप

1 जानेवारी 2009 मुंबईसीरियल किलर रवींद्र कंट्रोलेला दोषी ठरवण्यात आलंय. मरिन लाईन्स खून प्रकरणी,त्याला मुंबईतल्या शिवडी न्यायालयानं दोषी ठरवलंय.या प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कंट्रोलच्या 7 खून प्रकरणापैकी मरिन लाईन्स इथल्या ब्रीजवरील खून प्रकरणात दोन साक्षीदारांनी कंट्रोलेला ओळखलं आहे या आधारावर न्यायालयाने कंट्रोलेला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असं आरोपी कंट्रोलेचे वकील कुंजू रमण यांनी सांगितलं.रवींद्र कंट्रोले हा बीयरमॅन म्हणून ओळखला जाणारा सीरियल किलर. त्याने एकामागोमाग एक असे 7 खून केले. त्याची खून करण्याची पद्धत सारखीच होती. तो दगडानं ठेचून खून करायचा.तसंच प्रत्येक मृतदेहाजवळ बीयरचा टीनही सापडायचा. खून करण्याआधी तो बीअर पिण्यासाठी समोरच्या व्यक्तीला भरीस पाडायचा असं म्हटलं जायचं. ऑक्टोबर 2006 ते जानेवारी 2007 या काळात दक्षिण मुंबईत हे खूनी सत्र चालू झालं होतं. त्यातल्या 11 जानेवारी 2007 रोजी मरीन लाईन्स ब्रीजवर झालेल्या खूनात कंट्रोले दोषी आढळला. शिवडी सेशन कोर्टाने त्याला जन्मठेप सुनावली.या आधीच्या खूनाच्या गुन्ह्यातून कंट्रोले सुटल्याने याही गुन्ह्यातून तो सुटेल असं म्हटलं जात होतं. पण अखेर त्याला शिक्षा झाली. दोन साक्षीदारांच्या जबानीसोबतच त्याची ब्रेन मॅपिंग टेस्ट आणि सायको अ‍ॅनालिसिस टेस्टही घेण्यात आली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 1, 2009 11:34 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 1, 2009 11:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close