S M L

पेटलेल्या उसात उडी घेऊन शेतकर्‍याची आत्महत्या

02 मे 2013लातूर : पाण्याअभावी वाळलेला ऊस, पंधरा दिवसांवर आलेलं मुलीचं लग्न, आणि कर्जफेडीसाठी बँकांनी लावलेला तगादा. यामुळे सुरेश सोमवंशी या शेतकर्‍यानं शेतातला वाळलेला ऊस पेटवून त्यात उडी घेतली. तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर शेतकर्‍याचा मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यातल्या निटूर गावात ही दुर्देवी घटना घडली. घरी अठराविश्व दारिद्र्य, त्यात विधवा आईसह पाच मुली आणि एक मुलगा असा आठ जणांचा संसार. दोन एकर शेतीवर त्याचा संसार चालतो. फक्त 35 हजार रुपयांच्या कर्जासाठी बँक अधिकारी त्यांच्याकडे सतत चकरा मारत होते. पण ज्या उसाच्या भरवशावर मुलीचं लग्न ठरवलं, ते ऊसाचं शेत पाण्याअभावी वाळल्यामुळे हतबल झालेल्या सुरेश सोमवंशी यांनी वाळलेल्या ऊसाला आग लावून त्यात उडी घेऊन आत्महत्या केली असं त्यांच्या पत्नीने पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 2, 2013 04:13 PM IST

पेटलेल्या उसात उडी घेऊन शेतकर्‍याची आत्महत्या

02 मे 2013

लातूर : पाण्याअभावी वाळलेला ऊस, पंधरा दिवसांवर आलेलं मुलीचं लग्न, आणि कर्जफेडीसाठी बँकांनी लावलेला तगादा. यामुळे सुरेश सोमवंशी या शेतकर्‍यानं शेतातला वाळलेला ऊस पेटवून त्यात उडी घेतली. तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर शेतकर्‍याचा मृत्यू झाला.

लातूर जिल्ह्यातल्या निटूर गावात ही दुर्देवी घटना घडली. घरी अठराविश्व दारिद्र्य, त्यात विधवा आईसह पाच मुली आणि एक मुलगा असा आठ जणांचा संसार. दोन एकर शेतीवर त्याचा संसार चालतो. फक्त 35 हजार रुपयांच्या कर्जासाठी बँक अधिकारी त्यांच्याकडे सतत चकरा मारत होते.

पण ज्या उसाच्या भरवशावर मुलीचं लग्न ठरवलं, ते ऊसाचं शेत पाण्याअभावी वाळल्यामुळे हतबल झालेल्या सुरेश सोमवंशी यांनी वाळलेल्या ऊसाला आग लावून त्यात उडी घेऊन आत्महत्या केली असं त्यांच्या पत्नीने पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 2, 2013 04:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close