S M L

फ्रायडे रिलीज

2 जानेवारी, मुंबई नवीन वर्षाला एक मोठा मराठी सिनेमा रिलीज होत आहे. ' एक डाव धोबीपछाड ' हे या सिनेमाचं नाव आहे. अशोक सराफ यांची निर्मिती असलेला हा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमाबरोबर दोन हॉलिवुडचे सिनेमे रिलीज होत आहेत. या आठवड्यात एकही हिंदी सिनेमा आला नाहीये. एक डाव धोबीपछाड हा विनोदी सिनेमा आहे. एक गुंड गुंडगिरी सोडायचं ठरवतो. तेही आपल्या जुन्या प्रेयसीसाठी. आणि त्यातून घडतात एक एक गमतीजमती. या गमतीजमती हीच तर ' एक डाव धोबीपछाड ' या सिनेमाची खासियत आहे. सिनेमात मुख्य भूमिकेत अशोक सराफ आहे. त्यांच्याबरोबर किशोरी शहाणे, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, मुक्ता बर्वे, मधुरा वेलणकर यांच्याही भूमिका आहेत. या सिनेमाचं कॉस्च्युम डिझायनिंग निवेदिता सराफनं केलं आहे. एकूणच नव्या वर्षाची सुरुवातीलाच कॉमेडी सिनेमा पाहून रिलॅक्स होता येईल. अशोक सराफ यांचा एव्हरग्रीन अभिनय पाहणं यात वेगळाच आनंद आहे. हॉलिवुड सिनेमांपैकी ' ऑस्ट्रेलिया ' रिलीज होतोय. ऑस्ट्रेलियाच्या मूळ रहिवाशांवर होणारा अन्याय या सिनेमात आहे आणि ही कथा एका लहान मुलाच्या नजरेतून पुढे जाते. सारा अ‍ॅशलेचा एका खलनायकाबरोबरचा लढा पाहता येईल. निकोल किडमन, ह्युज जॅकमन,जॅक थॉम्सन यांच्या मुख्य भूमिका आहेत. सिनेमाचं दिग्दर्शन बझ लुर्मनचं आहे . सिनेमात ऑस्ट्रेलियाचं सुंदर दर्शन पाहता येईल. दुसरा सिनेमा आहे 'आऊटसोर्सड् ' . अमेरिकेतल्या आऊटसोर्सिंगवर हा सिनेमा बेतला आहे. सिनेमाच्या हिरोला याचसाठी भारतात यावं लागतं, तेही त्याच्या मनाविरूद्ध. आणि मग त्याला येतात भारतातले एकेक अनुभव. सिनेमा कॉमेडी आहे. सिनेमात आयेशा धारकरची मुख्य भूमिका आहे.तिच्याबरोबर आहे जोश हॅमल्टन. हॉलिवुड सिनेमातला भारत पाहायला नक्कीच छान वाटेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 2, 2009 04:50 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 2, 2009 04:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close