S M L

कोलकाताचा राजस्थानवर 'रॉयल' विजय

02 मेकोलकाता नाईट रायडर्सची गाडी अखेर पुन्हा विजयाच्या रुळावर परतलीय. आज झालेल्या लढतीत कोलकाताने राजस्थान रॉयल्सचा 8 विकेट राखून पराभव केला. गतविजेत्या कोलकाताला यंदाच्या हंगामात सूर गवसला नव्हता. 10 पैकी 7 मॅचमध्ये कोलकाताला पराभव स्विकारावा लागला होता. त्यामुळे स्पर्धेतलं आव्हान कायम राखण्यासाठी कोलकाताला आजच्या मॅचमध्ये विजय गरजेचा होता. कोलकाताच्या खेळाडूंनीही आज दमदार कामगिरी केली. राजस्थानच्या प्रमुख बॅट्समनना झटपट आऊट करत कोलकाताच्या बॉलर्सनं राजस्थानला 132 रन्समध्ये रोखलं. तर बॅट्समननं विजयाचं हे माफक आव्हान 17 ओव्हरमध्ये पार करत टीमला शानदार विजय मिळवून दिला. जॅक कॅलिस आणि युसुफ पठाणनं फटकेबाजी करत विजयावर शिक्कामोर्तब केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: May 3, 2013 05:46 PM IST

कोलकाताचा राजस्थानवर 'रॉयल' विजय

02 मे

कोलकाता नाईट रायडर्सची गाडी अखेर पुन्हा विजयाच्या रुळावर परतलीय. आज झालेल्या लढतीत कोलकाताने राजस्थान रॉयल्सचा 8 विकेट राखून पराभव केला. गतविजेत्या कोलकाताला यंदाच्या हंगामात सूर गवसला नव्हता. 10 पैकी 7 मॅचमध्ये कोलकाताला पराभव स्विकारावा लागला होता. त्यामुळे स्पर्धेतलं आव्हान कायम राखण्यासाठी कोलकाताला आजच्या मॅचमध्ये विजय गरजेचा होता. कोलकाताच्या खेळाडूंनीही आज दमदार कामगिरी केली. राजस्थानच्या प्रमुख बॅट्समनना झटपट आऊट करत कोलकाताच्या बॉलर्सनं राजस्थानला 132 रन्समध्ये रोखलं. तर बॅट्समननं विजयाचं हे माफक आव्हान 17 ओव्हरमध्ये पार करत टीमला शानदार विजय मिळवून दिला. जॅक कॅलिस आणि युसुफ पठाणनं फटकेबाजी करत विजयावर शिक्कामोर्तब केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 3, 2013 05:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close